रूपाली चाकणकर यांच्या बोटाला दुखापत कशी झाली? सीसीटीव्हीमध्ये मिळेल पाहायला…

rupali-chakankar-finger
Share

पुणे: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी तंत्र मंत्र आणि पूजा करताना आपल्या बोटाची अनामिका कापल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपांना धायरीमधील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा व्हिडिओ पोस्ट करत रुपाली चाकणकर यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या नादाला लागून चाकणकर यांनी अनामिका कापल्याचे अंधारे म्हणाल्या होत्या. चाकणकर यांच्या याच फोटोवरून महाराष्ट्रात गदारोळ निर्माण झाला होता.

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

रूपाली चाकणकर यांनी धायरीमधील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत संबंधित व्यक्ती सांगत आहे की रूपाली चाकणकर प्रत्येक वर्षी आमच्या गणेश मंडळाच्या आरतीला येतात. यंदाही त्या आरतीला आल्या असता गाडीतून उतरताना त्यांचे बोट दरवाज्यात अडकून त्यांना दुखापत झाली. टिश्यू पेपरने जखम कोरडी करून त्यांनी गणपती बाप्पाची आरती पूर्ण केली. हा संपूर्ण प्रकार तुम्हाला आमच्या मंडळाच्या सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळेल, असा दावा गणेश मंडळाचा अध्यक्ष करीत आहे. तसेच रूपाली चाकणकर यांच्यावर होणारे आरोप वैयक्तिक स्वरूपाचे असून फोटोंबाबत ध चा मा करणारे आहेत, असे व्हिडिओमध्ये गणेश मंडळाचा अध्यक्ष सांगतो आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

रूपाली चाकणकर यांनी हाच व्हिडिओ आपल्या समाज माध्यमांवर शेअर करत सुषमा अंधारे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, गेली 20-22 वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करताना जसजसा प्रगतीचा आलेख वाढत गेला तस तशी चिखलफेक करण्याची विकृती वाढत गेली. प्रत्येक वेळी संयमाने शांतपणे टीका सहन केली, वैयक्तिक टीका करणे हे माझ्या रक्तातच नाही. पण आता सगळ्या मर्यादा ओलांडून माझ्यासह कुटुंबाला जो त्रास दिला जातो ते भीतीदायक आहे, ज्यांनी हा आयुष्याचा प्रवास जवळून पाहिला ते सर्व संपर्क करून आम्ही सोबत आहोत हे आवर्जून सांगत आहेत. खरात प्रकरणात मी पहिल्या दिवशीच भूमिका स्पष्ट केली आहे की तपास निष्पक्षपणे व्हावा, यासाठी आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतरही माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुराव्यासह स्पष्टीकरण दिले आहे, सत्य समोर येईलच.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rupali Chakankar (@rupali_chakankar)

अशोक खरात स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर जोड्या जुळवायचा अन्…

अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांनी घेतली उडी…

नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…

गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…

नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…

रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…

अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…

धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…

खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…

रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…

मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…

रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…

मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…

नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *