रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…

rupali-chakankar
Share

पुणे: नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे त्याच्याशी चांगले संबंध असल्याचे आरोप सुरू आहेत. कॅप्टन अशोक खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची झळ थेट रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचली आहे. रुपाली चाकणकर या फरार असल्याचा दावा त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

नाशिक मधून अशोक उर्फ कॅप्टन खरात याला अटक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. खरात याचे अनेक कारनामे समोर येत आहेत. शिवाय, व्हिडिओही पोलिसांच्या हाती लागले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात याच्या सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

गेल्या दोन दिवसांपासून रुपाली चाकणकर या माध्यमांसमोर आलेल्या नाहीत, हाच धागा पकडत रुपाली पाटील यांनी फेसबुकवर “राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार… बजाव ताली!” अशी उपरोधिक पोस्ट केली आहे. नाशिकमधील खरात प्रकरणात चाकणकर यांचे नाव वारंवार घेतले जात असल्याने त्या जाणीवपूर्वक माध्यमांपासून दूर राहत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

अशोक खरात याने दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, रुपाली चाकणकर या खरातची ‘पाद्यपूजा’ करत असल्याचा व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल झाल्याने त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्याशिवाय, आरोपी खरात याने स्थापन केलेल्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर यांची वर्णी लागली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…

रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…

मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…

नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…

अजितदादा विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; माझ्याकडे मोठी माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *