रुपाली चाकणकर यांचा पाय खोलात; खरातसोबत गुवाहाटी दौरा…

rupali-chakankar
Share

मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळीकतेमुळे महिला आयोगावरून गच्छंती झालेल्या रुपाली चाकणकर यांच्यापुढील अडचणी वाढताना दिसत आहेत. अशोक खरात याच्याबरोबर माझे कोणतेही आर्थिक स्वरुपाचे संबंध नव्हते असे सांगणाऱ्या चाकणकर यांचा खरातसोबत गुवाहाटी दौरा ईडी चौकशीच्या बरोबर एक दिवस आधी लीक झाल्याने त्यांच्यासमोरील अडचणी कोण वाढवतंय? असा प्रश्न दबक्या आवाजात चर्चिला जात आहे.

अशोक खरात आणि रूपाली चाकणकर तसेच प्रतिभा चाकणकर यांनी २०२१ मध्ये गुवाहाटी दौरा केला होता. गुवाहाटीच्या रेडीसन ब्लू हॅाटेलमध्ये एकाच तारखांना तिघेही वास्तव्यास होते. २८ ऑगस्ट २०२१ ते ३० ॲागस्ट २०२१ या तारखांना हे तिघेही रेडीसन ब्लू या हॅाटेलमध्ये वास्तव्यास होते. या तारखांमध्ये त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्चा केल्याची शक्यता आहे. अशोक खरात भक्तांकडून लाखो रुपये घेऊन ज्या पूजा अर्चा करायचा, तशीच पूजा अर्चा गुवाहाटीमध्ये केल्याची चर्चा आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

अशोक खरात याच्या शिवनिका संस्थानावर रुपाली चाकणकर या सदस्या विश्वस्त होत्या. नाशिकमधील मिरगावातील शिवनिका संस्थानावर गेल्या काही वर्षांपासून चाकणकर विश्वस्त म्हणून काम करायच्या. महिन्यातून दोन-तीन वेळा त्यांची मिरगावात फेरी व्हायची. याचदरम्यान त्यांनी अशोक खरात याला आध्यात्मिक गुरू मानले. अध्यात्माचे नाते जोडल्याने चाकणकर-खरात यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले. जेव्हा खरातच्या संबंधाने लैंगिक शोषणाची शेकडो प्रकरणे आणि भक्तांकडून केलेली आर्थिक लूट समोर आली तेव्हा चाकणकर यांनी हात झटकले. मला त्याच्याबद्दल काहीही माहिती नव्हते, केवळ अध्यात्मापुरताच आमचा संबंध आला, असे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु चौकशीदरम्यान चाकणकर यांची खरातसोबत असलेली जवळीक अधोरेखित झाली.

अशोक खरात याच्यासंदर्भाने चाकणकर यांना एसआयटीने चौकशीला बोलावले. त्यांची जवळपास साडे पाच तास चौकशी झाली. खरातशी ओळख कधी आणि कशी झाली, संबंध कसा आला, आर्थिक देवाणघेवाण झाली का? अशा प्रश्नांची सरबत्ती चाकणकर यांच्यावर केली गेली. एसआयटी चौकशी संपते ना संपते तोच चाकणकर यांच्या पतीला ईडीचे समन्स आल्याचे वृत्त समोर आल्यामुळे चाकणकर यांचा पाय अधिकच खोलात गेला आहे.

खरात प्रकरणातच आर्थिक अफरातफरीचा आरोप ठेवून चाकणकर यांना ईडीने गुरूवारी चौकशीसाठी बोलावले आहे. त्याआधी त्यांचा खरातसोबत गुवाहाटी दौरा समोर आल्याने चाकणकर चहूबाजूंनी अडकल्याचे बोलले जाते. त्यांचा पाय अधिक खोलात जावा, यासाठी सत्ता पक्षातील काहीजण प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.

अशोक खरात याची दुसरी बाजू माहीत नव्हती : रुपाली चाकणकर

रुपाली चाकणकर यांची बहीण गोत्यात, ईडीनं पाठवलं समन्स, धक्कादायक आकडा…

खळबळजनक आरोप! अशोक खरात हा एकनाथ शिंदे अन् रुपाली चाकणकर यांचा गुरु…

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना पहिला धक्का…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *