नाशिक: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या रुपाली चाकणकर यांचे भोंदू अशोक खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पद गेलं. पुढे पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही त्यांना पायउतार व्हावं लागले. या दोन धक्क्यांनंतर त्यांच्याभोवती आता चौकशीचा ससेमिरा लागला आहे. काल एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी रुपाली चाकणकर यांची तब्बल 6 तास चौकशी केली.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका रुपाली चाकणकर यांच्यावर आहे. खरातसोबतचे संबंध आणि त्यानंतर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी झाली. दरम्यान या आधीच त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचीही चौकशी करण्यात आली. अशोक खरात याने पतसंस्थेत उघडलेल्या बोगस खात्यांच्या प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांची चौकशी झालेली. दरम्यान एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असून चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. दरम्यान, एसआयटी चौकशीत रुपाली चाकणकर काय काय म्हणाल्या याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
माझे कुटुंब वारकरी संप्रदायाचे असून, मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानले होते. माझे आणि अशोक खरातचे आर्थिक संबंध नसून खरातकडे जाण्यासाठी मी कुणालाही आग्रह केला नाही. अशोक खरात याची दुसरी बाजू मला माहीत नव्हती, असा दावा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. चौकशीत मी सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तर दिली आहेत. मला विश्वास वाटतो नक्कीच त्यांचं उत्तराने समाधान झाले असेल. पोलिसांना या तपासात जसं माझं सहकार्य हवं असेल ते पूर्णपणे मी सहकार्य करेन. काय प्रश्न विचारले हे अहवालातून तुम्हाला कळेल, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. पोलिसांना जे आवश्यक होतं त्यात मी सर्व सहकार्य केले. तपासात सविस्तर मी तपास यंत्रणासोबत बोलले. समर्पक उत्तर दिली आहे. चौकशी संदर्भात सविस्तर अहवाल तुमच्यापर्यंत येईल, असेही रुपाली चाकणकरांनी सांगितले.
रुपाली चाकणकर यांची बहीण गोत्यात, ईडीनं पाठवलं समन्स, धक्कादायक आकडा…
खळबळजनक आरोप! अशोक खरात हा एकनाथ शिंदे अन् रुपाली चाकणकर यांचा गुरु…
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…
राजकीय वर्तुळात खळबळ! सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका…