समर्थ रामदासांच्या ‘उपभोग शून्य स्वामी’ संकल्पनेनुसार नरेंद्र मोदींचं काम; पुढील महिनाभर सेवा संकल्प अभियान

Share

मुंबई: २०१४ पूर्वी हा देश भ्रष्टाचार, जातीवाद आणि परिवारवादाने ग्रासला होता, पण नरेंद्र मोदींच्या शासनकाळात या नकारात्मक गोष्टी समूळ नष्ट झाल्या. आज भारत हा विकसित देशांच्या मार्गावर असून, जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपल्या भारताकडे पाहिले जाते. या सगळ्याचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आहे, असा गौरवोद्गार केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी येथे काढले. पंतप्रधान मोदींनी आधी गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून २५ वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. त्यांनी समर्थ रामदासांच्या ‘उपभोग शून्य स्वामी’ संकल्पनेच्या आधारे काम केल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

सलग २५ वर्षे प्रमुख म्हणून काम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंद झाली आहे. त्या निमित्ताने भाजपच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर असा महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. एका महिन्याभरात भाजपच्या वतीने प्रमुख १२ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची माहिती शाह यांनी दिली.

अमित शाह म्हणाले, “मोदींनी त्यांच्या शासनव्यवस्थेची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या या कारकीर्दीत सेवाभाव राहिलेला आहे .सलग २५ वर्ष जनेतची सेवा करणे ही मोठी बाब आहे. त्यानिमित्ताने देशभरात आम्ही सेवा संकल्प अभियान घेऊन जाणार आहोत. नरेंद्र मोदींनी स्व:तला प्रधानसेवक म्हणून जाहीर केले आहे.”

अमित शाह म्हणाले, “भ्रष्टाचार, जातीवाद आणि परिवारवादाने या आधी देशाला ग्रासलं होते. २०१४ नंतर नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सुरू झाली आणि या तीन गोष्टी समूळ नष्ट झाल्या. जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे. २५ कोटी लोक हे दारिद्ररेषेच्या वरती आले आहेत. भारताचा विकास हा विकसित देशाच्या दिशेने सुरू झाला आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत भारताची पत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधारली असून, पासपोर्टचे महत्त्वही वाढले आहे, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!