सिलेंडर पुरवठ्याबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय…

gas-cylinder
Share

मुंबई : आखाती देशांमधील युद्धामुळे सध्या गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचे चित्र असून गॅस मिळवण्यासाठी गॅस केंद्राबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लावताना दिसत आहेत. राज्य सरकाने या तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर आता केरोसिनचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर केरोसिन उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु असल्याची माहितीही राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत दिली.

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

छगन भुजबळ म्हणाले, ‘गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळं अनेक शहरात हॉटेल्स शिवाय लहान खाद्य व्यवसायही अचडणी आलेले असून नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने बाजारात मोठ्या प्रमाणावर केरोसिन उपलब्ध करुन देण्याची योजन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार लवकरच पेट्रोल पंपांवर आता केरोसिन मिळणार आहे. शिवाय एलपीजी गॅस पुरवठ्याबाबतही नागरिकांनी कोणतीही काळजी करु नये.’

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषजेद एलपीजी गॅस तुटवड्याबाबतही माहिती दिली. ज्यात त्यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींची चर्चा केली आणि राज्यातील जे घरगुती एलपीजीचे दररोजचे उत्पादन 9000 मेट्रिक टन होते ते आता 11,000 मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्याची माहिती दिलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात एलपीजी उत्पादनात येणाऱ्या अडचणी दूर होतील.

एकनाथ शिंदे यांच्याकडून गॅस पुरवठ्यावर स्पष्टीकरण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *