पुणे: राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले. अजितदादांसह अन्य ५ जणांचा आपले प्राण गमवावे लागले. अजितदादांचा विमान अपघात झालेल्या गावातच आणखी एक विमान कोसळल्याची घटना झाली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात आज (बुधवार) पुन्हा एकदा विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने, वैमानिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीमधील ‘रेड बर्ड’ (Red Bird) या नामांकित कंपनीचे पायलट ट्रेनिंग विमान आज सकाळी नियमित प्रशिक्षणासाठी आकाशात झेपावले होते. सकाळी ८:४० वाजण्याच्या सुमारास विमान गोजूबावी गावाच्या उत्तर दिशेला सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असताना अचानक विमानात तांत्रिक बिघाड झाला. हवेतच विमानाचा इंजिनचा आवाज बंद पडल्याने वैमानिकाचे नियंत्रण सुटण्याची भीती निर्माण झाली होती.
विमान कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाही, शिकाऊ वैमानिकाने कमालीचे प्रसंगावधान राखले. विमानाचा वेग आणि जमिनीचे अंतर लक्षात घेत त्याने विमानाची दिशा लोकवस्तीकडून शेताकडे वळवली. जवळच असलेल्या एका उसाच्या शेतात वैमानिकाने विमानाचे सुरक्षितरीत्या ‘इमर्जन्सी लँडिंग’ केले. जमिनीला आदळताना विमानाचे नुकसान झाले असले, तरी वैमानिकाला कोणतीही गंभीर इजा झालेली नाही.
विमानाचा अपघात झाल्याचे पाहताच परिसरातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी प्रशिक्षण घेणारा वैमानिक प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांनी त्याला धीर दिला आणि तातडीने कंपनीच्या प्रशासनाला व पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान, बारामतीत वारंवार होणाऱ्या प्रशिक्षण विमानांच्या अपघातांमुळे आता सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) या घटनेची चौकशी करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रावर शोककळा! अजित पवार यांचे विमान अपघातात निधन…
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवार यांनी महत्वाचं विधान…
अजितदादा विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवार यांचा खळबळजनक दावा…
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता मोठे वळण…
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा पहिला अहवाल समोर; धक्कादायक माहिती…