मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 16 विधानपरिषद जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६ जागांसह एका जागेसाठीची पोटनिवडणूक पार पडणार आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून या जागा रिक्त असल्याने विधान परिषदेचे संख्याबळ घटले होते, जे आता पुन्हा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीतही काही धक्कातंत्र दिसणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न झाल्यामुळे या मतदारसंघातील आमदारांचा कार्यकाळ संपूनही निवडणुका घेता आल्या नव्हत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न झाल्या आहेत. नियमानुसार, संबंधित मतदारसंघातील एकूण सदस्यांपैकी किमान ७५ टक्के मतदार संख्या उपलब्ध असेल, तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. सध्या ही अट पूर्ण होत आहे. त्यामुळेच आज निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडून देण्यात येणाऱ्या १६ जागांसह एका जागेची पोटनिवडणूक होईल. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्यांपैकी २२ सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडले जातात. आता, त्याच जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे, ठाणे, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, नागपूर आणि संभाजीनगर-जालना यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि धाराशिव-लातूर-बीड या मतदारसंघांकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीमुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी वरिष्ठ सभागृहातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून, इच्छुकांच्या हालचालींनाही वेग आला आहे.
असा निवडणूक कार्यक्रम…
१. अधिसूचना जारी करणे: २५ मे, २०२६ (सोमवार)
२. उमेदवारी अर्ज (नामांकन) दाखल करण्याची अंतिम तारीख: ०१ जून, २०२६ (सोमवार)
३. उमेदवारी अर्जांची छाननी: ०२ जून, २०२६ (मंगळवार)
४. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: ०४ जून, २०२६ (गुरुवार)
५. मतदानाचा दिवस: १८ जून, २०२६ (गुरुवार)
६. मतदानाची वेळ: सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत
७. मतमोजणी: २२ जून, २०२६ (सोमवार)
८. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची अंतिम तारीख: २५ जून, २०२६ (गुरुवार)
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात सावळागोंधळ…
कोणत्या मतदारसंघात होणार मतदान?
| स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ | प्रतिनिधीत्व केलेलया आमदाराचे नाव |
| सोलापूर मतदारसंघ | प्रशांत प्रभाकर परिचारक |
| अहमदनगर मतदारसंघ | अरुणकाका बालभीमराव जगताप |
| ठाणे | रविंद्र सदानंद फाटक |
| जळगाव मतदारसंघ | चंदूभाई व्ही. पटेल |
| सांगली-सह-सातारा मतदारसंघ | कदम मोहनराव श्रीपती |
| नांदेड मतदारसंघ | अमरनाथ अनंतराव राजूरकर |
| यवतमाळ मतदारसंघ | दुष्यंत सतीश चतुर्वेदी |
| पुणे मतदारसंघ: | अनिल शिवाजीराव भोसले |
| भंडारा-सह-गोंदिया मतदारसंघ | डॉ. परिणय रमेश फुके |
| रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ | अनिकेत सुनील तटकरे |
| नाशिक मतदारसंघ | नरेंद्र भिकाजी दराडे |
| वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघ | रामदास भगवानजी आंबटकर |
| अमरावती मतदारसंघ | प्रवीण रामचंद्र पोटे |
| उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघ | धस सुरेश रामचंद्र |
| परभणी-सह-हिंगोली मतदारसंघ | विप्लव गोपीकिसन बाजोरिया |
| औरंगाबाद-सह-जालना मतदारसंघ | अंबादास एकनाथराव दानवे |