मुंबईः शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीतील दोन बडे नेते अजित पवार यांच्याविषयी अत्यंत खालच्या भाषेत बोलतानाची एक ऑडिओ क्लीप समोर आली आहे. ही क्लीप सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी ऐकली आहे. हे दोघे अजित पवारांविषयी काय बोलले हे सुनेत्रा वहिनींना माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवायच्या आधी राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने सुनेत्रा पवार यांना ही ऑडिओ क्लीप ऐकली होती, असे रोहित पवार यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादींची युती झाल्यानंतर मी शेवटचे चार महिने अजितदादांसोबत होतो. तेव्हा अजितदादांनी तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याबाबत अनेकदा नकारात्मक मत व्यक्त केले होते. दादा गेल्यावर त्यांनी पक्ष ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला, असा पुनरुच्चार रोहित पवार यांनी केला. राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व निधी आणि खर्चाची सुत्रे आता सुनेत्रा, पार्थ आणि जय पवारांकडे असणार आहेत . यावरून रोहित पवारांनी राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. मात्र, रोहित पवार यांचा नेमका रोख कुणाकडे आहे? अशी चर्चाही यावरून सुरू झाली आहे. दरम्यान भाजपसोबत कधीही जाणार नसल्याचे रोहित पवार यांनी ठणकावून सांगितले.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
“पटेल आणि तटकरे हे गेल्या 22 वर्षांपासून पक्षात आहेत. त्यावेळी पटेल आणि तटकरेंना पवार साहेबांनी सांभाळून घेतलं. प्रफुल पटेल यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाली, तटकरेंवरही पोलीस केस सुरू झाली. त्यावेळीही पटेल यांच्यासोबत दादांचं तितकंसं चांगलं नव्हतं. शेवटच्या चार महिन्यांमध्ये मी दादांसोबत काम केले. त्यावेळी दादा वेगवेगळ्या मुद्द्यांवर व्यक्त व्हायचे. त्यातल्या त्यात पटेल आणि तटकरे यांच्याबद्दल दादा जास्तच नकारात्मक पद्धतीने व्यक्त झाले होते. राष्ट्रवादीचे निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं पत्र समोर यायच्या आधी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचा एक ऑडिओ पार्थ आणि सुनेत्राकाकींनी ऐकला. त्यामध्ये त्यांनी दादांबद्दल नकारात्मक पद्धतीने चर्चा केली होती. तो ऑडिओ कुणाकडे आहे ते माहिती आहे, गरज पडल्यास तो आम्ही बाहेर आणू शकतो.”
आता काही आमदारांना वाटतंय की पटेल-तटकरेंच्या संबंधामुळे त्यांना भाजपमध्ये स्थान मिळेल. त्यांना मला एक सांगायचं आहे. जे पवार साहेबांचे झाले नाहीत, जे अजितदादांचे झाले नाहीत, ते आमदारांचे काय होणार? असेही रोहित पवार म्हणाले.
अजितदादा गटाच्या कारभाराबाबत एक खळबळजनक आरोप…
राष्ट्रवादीतील नाराजीनाट्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तभेट; कोणाला सुगावाही नाही…
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात सावळागोंधळ…
चर्चांना उधाण! बारामतीचा पुढचा वारसदार कोण? तिसऱ्या पिढीचे दौरे अन्…
सुप्रिया सुळे म्हणाल्या; पवार यांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही, मागच्या वेळेस…