छत्रपती संभाजीनगर : एआयएमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालय आज (बुधवारी) सकाळी बुलडोझरने पाडण्यात आले. ही कारवाई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात केली आहे. नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. मतीन पटेलने तिला आपल्या घरात आश्रय दिला होता. यानंतर 9 मे रोजी महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती आणि 72 तासांत उत्तर मागितले होते. अखेर, आज मतिन खानच्या त्या घरावर देखील बुलडोजर चालवण्यात आले आहे.
निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना पोलिसांपासून वाचवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षित स्थळ मिळवून देण्यात मतीन पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. केवळ राहण्याची सोयच नाही, तर तपासाची दिशा भरकटवण्यासाठी आणि पोलिसांपासून लपून राहण्यासाठी पटेल यांनी निदा खान हिला वेळोवेळी मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांना सहआरोपी देखील करण्यात आले आहे, त्यानंतर आता महापालिकेने त्यांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवून मोठा दणका दिला आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
महापालिकेचे पथक आज सकाळी ६ वाजता बुलडोझरसह घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या या भूमिकेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, कारवाई दरम्यान काही लोकांनी महापालिका आयुक्तांवर फुलांची उधळण केली. निदा खान ज्या घरात ७ दिवस राहिली होती, त्या घरावरही लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, नाशिक मधील टीसीएस (TCS) धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला लपण्यासाठी मदत करणे एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांना चांगलंच भोवले आहे. गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांविरोधात प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आणि मतीन पटेल यांच्या निवासस्थानावर महापालिकेने बुलडोझर चालवला आहे. मतीनच्या घरच्यांनी मनपा पथक अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कारवाईसाठी आले असताना संविधान देऊन आणि फुलं टाकून स्वागत केले. या कारवाईवेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, 1 डीसीपी, 2 एसीपी, ११ पीआय, 15 पीएसआय एपीआय, 8 महिला पोलीस अधीकारी, 120 पुरुष कर्मचारी, 60 महिला कर्मचारी 100 मनपा कर्मचारी उपस्थित होते.
बारामतीत अजितदादांचा अपघात झाला तिथंच आणखी एक विमान कोसळलं, वेळ तीच वेळ अन् गावही…
तुमची ‘मन की बात’ खूप झाली; राज ठाकरेंचं नरेंद्र मोदींना धडधडीत पत्र; चुका तुमच्या अन् भुर्दंड…