अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता मोठे वळण…

ajit-pawar-plane-crash
Share

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला होता. विमान अपघात प्रकरणातील अहवाल समोर आल्यानंतर आता सीआयडी अॅक्शनमोडमध्ये आली आहे. पुणे सीआयडी कार्यालयात व्हीएसआर कंपनीचे मालक, अधिकारी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी सातत्याने अपघाताच्या मुद्यावर शंका उपस्थित केल्या आहेत.

सीआयडीने ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या विमान कंपनीची कसून चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात सीआयडीने कंपनीला एक सविस्तर प्रश्नावली पाठवली असून, संचालक रोहित सिंग यांनाही चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची दाट शक्यता आहे. व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह आणि कंपनीचे कर्मचारी यांची सीआयडी कार्यालयात चौकशी सुरू आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

सीआयडीने २८ जानेवारी रोजी झालेल्या विमानाचा प्रवास आणि त्याच्या बुकींग प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विमानाचे भाडे किती होते, बुकींग कोणी केले, विमानाची तांत्रिक स्थिती काय होती आणि कंपनीची इतर कायदेशीर कागदपत्रे योग्य होती का, या सर्व बाबींचा तपास आता सीआयडी करणार आहे.

अजित पवार यांच्या प्रवासासाठी संबंधित विमानाची निवड कोणी केली? त्या दिवशी विमानासाठी वैमानिकाची (Pilot) नियुक्ती कोणी आणि कोणत्या निकषावर केली? विमानाचे नियमित मेंटेनन्स झाले होते का? अशा विविध मुद्यांवरील प्रश्नावली सीआयडीने व्हीएसआर कंपनीला पाठवली आहे. विशेष म्हणजे, DGCA ने २४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या अहवालात व्हीएसआर कंपनीच्या कामकाजातील गंभीर दोष समोर आणले होते. या अहवालाचा आधार घेत आता सीआयडीने तपास अधिक तीव्र केला आहे.

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर सातत्याने शंका उपस्थित केली होती. त्याशिवाय, डीजीसीएने नियुक्त केलेल्या एआयबीच्या अहवालातील त्रुटींवरही बोट ठेवले होते. रोहित पवार यांनी या अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचाही आरोप केला होता.

अजित पवार यांच्या घातपाताचा संशय! राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग…

रोहित पवार यांच्याकडून विमान अपघात अहवालाची चिरफाड; विमानाची रेकी…

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा पहिला अहवाल समोर; धक्कादायक माहिती…

अजितदादांना जाऊन एक महिना झाला, रोहित पवार यांची हृदयद्रावक पोस्ट…

अजितदादांसाठी रोहित पवार, युगेंद्र पवार बारामती पोलिस ठाण्यात जाणार; मुंबईत नाही घेतली FIR…

अजित काकांसाठी आम्ही लढत राहू, मराठी माणूस दाखवून देऊ: रोहित पवार

अजितदादा विमान अपघात प्रकरण! रोहित पवार यांचा दिल्लीत नवा गौप्यस्फोट…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *