रोहित पवार यांच्याकडून विमान अपघात अहवालाची चिरफाड; विमानाची रेकी…

ajit-pawar-plane-crash
Share

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी तिसरी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

रोहित पवार म्हणाले, ‘मी व्हिएसआर आणि डिजीसीएच्या विरोधात नाही. सत्य बाहेर यावं यासाठी मी खटाटोप करत आहे. विमान सूरतला गेलं हे आम्ही म्हणत होतो. तेही अहवालात आले आहे. विमानात क्षमतेच्या ९० टक्के इंधन हे अहवालातही समोर आले आहे. अहवालात बारामतीला जिल्हा करून टाकलं आहे. एएआयबी आपल्या अहवाला बाबत किती सीरियस आहे हे यातून दिसून आले आहेत. जिथे विमान कोसळलं तिथे झाडे नव्हते. मात्र अहवालात तसं सांगण्यात आलं आहे. अहवालात तपास अधिकाऱ्याचे नाव का नाही?’

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

दुसरीकडे विमानाची रेकी करण्यासाठी काही लोक आले होते, असे स्थानिकांचं म्हणणं आहे त्याची चौकशी करावी असे आमचे म्हणणं आहे. अजितदादांच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन टीमचं कुठेही नाव आलेलं नाही, असेही रोहित पवार म्हणाले आहेत.

मनोज पवार च्या मेसेज नुसार विदीप जाधव 7.17 ला पोहचले. 21 मिनिटाचा गॅप रिपोर्ट नुसार अजित दादा 7.59 ला विमानात बसले मनोज पवार च्या मेसेज नुसार – दादा 7.54 ला विमानात बसले. रिपोर्टनुसार – 7.21 वा. पायलटने walk around inspection केलं. तर मग मनोज पवार च्या मेसेजमध्ये 7.10 ला ALL OK SIR चा मेसेज का पाठवला? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा पहिला अहवाल समोर; धक्कादायक माहिती…

अजितदादांना जाऊन एक महिना झाला, रोहित पवार यांची हृदयद्रावक पोस्ट…

अजितदादांसाठी रोहित पवार, युगेंद्र पवार बारामती पोलिस ठाण्यात जाणार; मुंबईत नाही घेतली FIR…

अजित काकांसाठी आम्ही लढत राहू, मराठी माणूस दाखवून देऊ: रोहित पवार

अजितदादा विमान अपघात प्रकरण! रोहित पवार यांचा दिल्लीत नवा गौप्यस्फोट…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *