नवी दिल्ली: शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सातत्याने अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विविध संशय उपस्थित करत आहेत. अजित पवार यांचा अपघात झाला नसून घातपात असावा, अशी शंका ते उपस्थित करत आहेत. त्यांनी आतापर्यंत मुंबईत दोन आणि दिल्लीत एक पत्रकार परिषद घेत विविध खुलासे, दावे आणि गौप्यस्फोट केले आहेत. आज पुन्हा रोहित पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आहे.
या पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. व्हीएसआर कंपनीला सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांकडून वाचवलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास संथ गतीने होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. याबाबतचं पत्रही आपण मोदींना लिहिणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले, “अजितदादांच्या विमान अपघाताबाबत आम्ही जेवढा सखोल तपास करत आहोत. त्यात एकच गोष्ट आम्हाला दिसून येत आहे. ती म्हणजे व्हीएसआर कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा आहे. यातील बरेच लोक सत्ताधारी पक्षातील आहेत. काहीजण काही राज्यात सत्तेत आहेत. त्यांचा केंद्रातील सत्ताधारी पक्षाला पाठिंबा आहे. यात राजकीय पक्षांशी निगडीत असलेले मोठमोठे उद्योगपतीही या कंपनीशी संबंधित आहेत. घातापाताबद्दल बोलायचं झालं, तर आम्हाला दोन प्रकाराचा संशय आहे. राजकीय आणि कमर्शिअल… आता यात नेमकं कोणतं कारण खरं आहे, त्याचा शोध आम्ही घेत आहोत. यात व्हिएसआर कंपनी जबाबदार आहे. या कंपनीला कुणी वाचवत असेल तर तेही या कटाचा भाग असू शकते. या कंपनीच्या मागे खूप शक्तीवान लोक आहेत. डीजीसीएचे अधिकारी आहेत.’
‘मला वाटतं अजितदादांना न्याय द्यायचा असेल, या प्रकरणात तपास करायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच अजित दादांना न्याय देऊ शकतात, कारण बाकी लोक जे यात सहभागी आहेत, तेही पॉवरफुल आहेत. त्यामुळे मोदी आणि शहा यांना माझी विनंती आहे की त्यांनी यात लक्ष घालावे. मी एक पत्रही आज पंतप्रधानांना देणार आहे. इमेलच्या माध्यमातून हे पत्र देणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेतून आमची एक खूप मोठी मागणी आहे. ती म्हणजे नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा. त्यांचाच व्हीएसआर कंपनीला पाठिंबा आहे, असा आम्हाला संशय आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी आम्ही मागणी करतो. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देखील हे प्रकरण आपल्या हातात घ्यायला हवं, अशी आमची त्यांना विनंती आहे, असेही रोहित पवार म्हणाले.
अजितदादांचा घातपात? रोहित पवार यांच्या प्रश्नांनंतर सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी…
काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय; रोक सके तो रोक लो…
अजितदादांचं विमान पायलटने मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला…
रोहित पवार यांचा पुन्हा गौप्यस्फोट; अजितदादांच्या विमानाचा पुन्हा स्फोट का झाला…
अजित दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट किती पाहा…
अजित पवार विमान अपघात! पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा CCTV समोर आणा…
अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
अजित दादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चाललं; रोहित पवार यांचा नवा खुलासा…