अजित दादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चाललं; रोहित पवार यांचा नवा खुलासा…

ajit-pawar-plane-crash
Share

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत खळबळ उडवून दिली आहे. अजित पवारांचा अपघात कसा झाला? ते कारने पुण्याला जाणार होते, मग विमानाने का गेले? यात कुणाचा सहभाग असावा, असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले. शिवाय अजित दादांना घेऊन जाणाऱ्या व्हीएसआर कंपनीवर देखील त्यांनी अनेक खळबळजनक आरोप केले.

रोहित पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवीन खुलासा केला आहे. अजित पवार यांच्या मृतदेहाबद्दल डॉक्टरांनी काय माहिती दिली याबाबत खुलासा केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही बाब आपण सांगितली नव्हती असेही ते म्हणाले. खरं तर, ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओज व्हायरल झाले होते. ज्यात अजित पवार यांचा मृतदेह काही प्रमाणात फुगल्याचा दावा केला जात होता. याबाबतचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील केला होता. आता हाच मुद्दा रोहित पवार यांनी अधोरेखित केला आहे. “अजित पवार यांचा मृतदेह जास्त फुगला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दादांची बॉडी फार जास्त फुगली होती, अशी नवी माहिती रोहित पवार यांनी दिली. यामुळे आता अजित पवार यांच्या सोबत नेमकं काय घडलं? याचं गूढ वाढतच चाललं आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

दरम्यान, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीमध्ये झालेल्या एका भीषण विमान अपघातात झाला. अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने (Learjet 45) निघाले होते. बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ते जाणार होते. मात्र सकाळी ८:४३ ते ८:४५ च्या सुमारास बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ हे विमान कोसळले.

विमान धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. विमान कोसळल्यानंतर काही स्फोटही झाले. या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी आणि दोन वैमानिक (कॅप्टन सुमित कपूर व कॅप्टन शांभवी पाठक) अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. आता या सगळ्या घटनेवर रोहित पवार यांनी शंका व्यक्त केली असून घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

अजित पवार अपघात प्रकरण! रोहित पवार दिल्लीत करणार मोठा खुलासा…

मोठी बातमी! अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवार यांनी घेतला तिघांवर संशय; थेट नावे सांगितली…

तीन अनुभव! अजित दादांचा फोन आला; दादा नक्कीच अजून आहेत…

अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण अन् खळबळजनक दावा…

अजित दादांचा अपघाताच्या 8 मिनिटांआधी अखेरचा फोन, पाहा विमानातून काय म्हणाले…

विमान अपघातावेळी ‘धुकं नव्हतं तर…, अजितदादांचा 100 टक्के घात झालाय…

अजित पवार भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत बोलले अन् 10 दिवसात…

अजित दादा पवार तुमच्यासाठी महाराष्ट्र रडला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *