अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण अन् खळबळजनक दावा…

ajit-pawar-plane-crash
Share

अकोला: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अपघाताबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. “विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत होते,” असे वक्तव्य करत अमोल मिटकरी यांनी या प्रकरणाला आता ‘घातपाता’चे नवे वळण दिले आहे.

अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील सभेत बोलताना अपघाताच्या दिवसाचा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, “घटनेच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता मी स्वतः घटनास्थळी पोहोचलो होतो. तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक सरपंचांनी मला एक हादरवून टाकणारी माहिती दिली. विमान कोसळत असताना त्यातून एक व्यक्ती बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी पाहिले होते. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गावकरी धावले, पण ते जवळ पोहोचण्यापूर्वीच विमानाचा भीषण स्फोट झाला असल्याचे मिटकरी यांनी सांगितले. या विमान अपघात प्रकरणात आता सरपंचांनी प्रत्यक्ष पाहिलेली ही बाब तपासाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

अजित पवार यांच्या मृत्यूबाबत मिटकरी यांनी पहिल्या दिवसापासून संशय व्यक्त केला आहे. आता अधिक आक्रमक होत त्यांनी स्पष्ट केले की, “हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत या मृत्यूचे गूढ उकलत नाही, तोपर्यंत मी जिवंत असेपर्यंत लढा देत राहीन. जर दादांच्या मृत्यूचा कट रचला गेला असेल, तर त्याचा बदला घेणे ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे.”

दरम्यान, मिटकरी यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करणारी ‘ती’ व्यक्ती कोण होती? तांत्रिक बिघाड की घातपात? असे अनेक प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत. या खुलाशांनंतर आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

अजित दादांचा अपघाताच्या 8 मिनिटांआधी अखेरचा फोन, पाहा विमानातून काय म्हणाले…

अजितदादांचा दशक्रिया विधी होणार नाही; कारण…

अजित पवार यांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल, म्हणाला…

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात अन् पायलटच्या मित्राची धक्कादायक माहिती…

अजित दादा पवार तुमच्यासाठी महाराष्ट्र रडला…

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *