पुणे: अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघाती निधन झाले. बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान सकाळी 8.46 वाजता विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत 29 जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज अजित पवार यांचे चुलत पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत अजितदादांसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाची रेकॉर्डिंग ऐकवली.
अखेरच्या कॉलमध्ये श्रीजीत पवार यांच्या सोबत अजित पवार यांचे संभाषण झाले होते. श्रीजीत पवार यांनी केलेल्या मेसेजला अजित पवार यांनी कॉल करुन उत्तर दिले. विमानाचे बारामतीमध्ये लँडिंगआधी अजित पवार यांनी नेटवर्क आल्यानंतर श्रीजीत पवार यांना कॉल केला होता.अजित पवार यांच्या विमानाचा अपघात सकाळी 8.46 वाजता झाला होता. त्याआधी 8 वाजून 37 मिनिटाला अजित पवार यांनी श्रीजीत पवार पवारांना कॉल केला होता. या कॉलमध्ये सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाण्याची अजित पवार यांची भूमिका होती आणि याबाबतच अजित पवार श्रीजीत पवारांसोबत फोनवर बोलत होते.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
श्रीजीत पवार म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारी बाबत श्रीजीत पवार आणि अजित पवारांचं शेवटचं बोलणं झालेलं. यामध्ये सर्व जाती धर्म सोबत आपण राहत आहोत सगळ्यांना न्याय देण्याचा पण काम करू. तसेच माळी समाजाला मी जिल्हा परिषद उमेदवारी दिली आहे. बाकीचे कोणी दिली नाही, इतर पक्षांनी कोणी दिले नाही आपण ती दिलेली आहे.’
अजित पवार यांचा लास्ट कॉल 8 वाजून 37 मिनिटांनी आहे. एका विषयावर मी अजित पवार यांच्याशी बोलणार होतो. 8.19 मिनिटांनी मी अजित पवार यांना मेसेज केला. रेंजमध्ये मेसेज मिळताच मला अजित पवार यांनी मला फोन केला. 8.37 वाजेपर्यंत अजित पवार बोलत होते. विमानात असताना अजित पवार यांनी फोन केला होता, असे श्रीजीत पवार म्हणाले. दरम्यान, अजित पवारांच्या विमानाचा अपघात साधारण 8.46 वाजता झाला होता.
अजितदादांचा दशक्रिया विधी होणार नाही; कारण…
अजित पवार यांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल, म्हणाला…
अजित पवार भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत बोलले अन् 10 दिवसात…
विमान अपघातावेळी ‘धुकं नव्हतं तर…, अजितदादांचा 100 टक्के घात झालाय…