अजित पवार यांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल, म्हणाला…

ajit-pawar-jay-pawar
Share

पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अंतर्गत वर्तुळात वेगवान राजकीय घडामोडी घडल्यामुळे पवार कुटुंबीयांना दु:ख बाजूला सारुन लगेच मैदानात उतरावे लागले होते. या दु:खातून सावरत असतानाच आता अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे.

जय पवार यांनी आपल्या व्हॉटसअॅप स्टेटसला वडिलांसोबतचे दोन फोटो ठेवले आहेत. यासोबत जय पवार यांनी काही मजकूरही लिहला आहे. यामध्ये म्हटले आहे की, “तुमची खूप आठवण येतेय. डॅड काश वेळ थांबली असती, मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. मिसिंग यू अ लॉट डॅड!”, असे जय पवार यांनी म्हटले. जय पवार यांच्या या स्टेटसचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

दरम्यान, अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी बारामती येथे येत असताना 28 जानेवारीला त्यांच्या विमानाचा बारामतीजवळ अपघात झाला होता. विमान धावपट्टीवर उतरताना कोसळले होते. यानंतर विमानाचा प्रचंड स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर मोठा आघात झाला होता. 29 जानेवारीला अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये प्रचंड गर्दी झाली होती.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांच्याकडील उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांच्या मंत्रि‍पदीही सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांनी सोमवारी कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. यानंतर सुनेत्रा पवार पुन्हा बारामतीत परतल्या होत्या. सुनेत्रा पवार या मंगळवारी काटेवाडी येथे असणार आहेत. काटेवाडी येथील सहयोग या निवासस्थानी पवार कुटुंब दुपारी चार वाजेपर्यंत सांत्वनपर भेटी स्वीकारणार आहे.

विमान अपघातावेळी ‘धुकं नव्हतं तर…, अजितदादांचा 100 टक्के घात झालाय…

महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री! मी सुनेत्रा अजित पवार शपथ घेते की…

अजित पवरांच्या निधनानंतर रोहित पवारांची भावनिक पोस्ट चर्चेत;  म्हणाले…

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात अन् पायलटच्या मित्राची धक्कादायक माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *