भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड…

Pankaja-Munde
Share

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे झेप घेण्यापूर्वीच राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले. उड्डाणापूर्वीच हा बिघाड लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी, त्यांच्या नियोजित सभांच्या वेळापत्रकावर याचा मोठा परिणाम झाला आहे.

पंकजा मुंडे या सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी झंझावाती दौरा करत आहेत. आज (मंगळवार) त्या प्रचारासाठी लातूर दौऱ्यावर जाणार होत्या. छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच पायलटच्या लक्षात हेलिकॉप्टरमधील तांत्रिक त्रुटी आली. खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले आणि तांत्रिक पथकाकडून तपासणी सुरू करण्यात आली.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बिघाडामुळे पंकजा मुंडे यांच्या लातूरमधील सभांच्या वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लातूरमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असतानाच या बिघाडाची बातमी आल्याने काही काळ चिंतेचे वातावरण होते. मात्र, पंकजा मुंडे या सुरक्षित असून त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. पण, वेळेची बचत करण्यासाठी आणि नियोजित सभा पूर्ण करण्यासाठी तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. पंकजा मुंडे आता दुसऱ्या हेलिकॉप्टरने लातूरकडे रवाना होणार असून, त्या सर्व सभांना हजेरी लावणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

अजित पवार यांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल, म्हणाला…

अजित पवार यांच्या निधनामुळे देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय…

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात अन् पायलटच्या मित्राची धक्कादायक माहिती…

महाराष्ट्रावर शोककळा! अजित पवार यांचे विमान अपघातात निधन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *