मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. स्थानिक नेते, पदाधिकारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रचार करतील. देवेंद्र फडणवीस कोणताही प्रचार करणार नाहीत.
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्याआधी 5 फेब्रुवारीपर्यंत प्रचारासाठी वेळ देण्यात आली आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या 7 दिवसांत 22 प्रचारसभा होणार होत्या. एकही सभा न घेण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे देवेंद्र फडणवीसांनी सर्व सभा रद्द केल्या आहेत.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 5 फेब्रुवार रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी रोजी होणार असून आहे. तर मतमोजणीची तारीखही बदलून 9 फेब्रुवारी करण्यात आली आहे.
दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबईतील लोकभवनात सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. कालच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देवगिरी जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली.
महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री! मी सुनेत्रा अजित पवार शपथ घेते की…
अजित पवरांच्या निधनानंतर रोहित पवारांची भावनिक पोस्ट चर्चेत; म्हणाले…