विधान परिषदेसाठी भाजपचे 11 उमेदवार जाहीर; पाहा तगड्या नेत्यांची यादी…

Share

मुंबईः भारतीय जनता पक्षाने (BJP) महाराष्ट्र विधान परिषदेसाठी त्यांच्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. भाजपने 11 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचा समावेश आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे होणारे सासरे अरून लखानी यांनाही वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधान परिषदेसाठी तिकीट जाहीर करण्यात आले आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने या नावांना मंजुरी दिली असून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने ही अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र या सर्वच विभागांतील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधील तगड्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

भाजप उमेदवारांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे:
वर्धा चंद्रपूर गडचिरोली – अरुण लखाणी
अमरावती – प्रवीण पोटे
सोलापूर – राजेंद्र राऊत
सांगली सातारा – धैर्यशील कदम
अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे
संभाजीनगर जालना – सुहास शिरसाट
नांदेड – अमर राजूरकर
धाराशिव बीड लातूर – बसवराज पाटील
जळगाव – नंदकिशोर महाजन
नागपूर – राजीव पोतदार

दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेल्या प्राजक्त तनपुरे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांना आता विधान परिषदेचं तिकीट देण्यात आलं आहे. दुसरीकडे, सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचं लग्न ठरल्यानंतर त्यांचे होणारे सासरे अरुण लखानी हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले होते. त्यांना भाजपकडून वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधान परिषदेसाठी तिकीट जाहीर करण्यात आले आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर…
अधिसूचना जारी : 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून
अर्जाची छाननी : 2 जून
अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून
मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4.
मतमोजणी : 22 जून

पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नियम बदलणार…

राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; मनोज जरांगे यांचे उपोषण मागे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *