राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; मनोज जरांगे यांचे उपोषण मागे…

manoj-jarange
Share

जालना : मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यासाठी मनोज जरांगे यांनी काल सकाळी 10 वाजतापासून आमरण उपोषण सुरु केलं होतं. त्यानंतर काल रात्री मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. अभ्यासकांच्या सूचवलेल्या दुरुस्त्या सरकारनं मान्य केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी रात्री साडेदहा वाजता जरांगे पाटलांची भेट घेतली. सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगेंनी मध्यरात्री 1.15 वाजता पाणी पिऊन उपोषण मागे घेतलं.

सरकारने राधाकृष्ण विखे पाटलांनी ड्राफ्ट आणला तर आम्ही अभ्यासक बोलावले. अभ्यासकांनी मागणीनुसार सहमती दिली. कुणबी नोंदीचा दस्तावेज देण्याचे मान्य केले आहे. व्हॉलिडिटी बाबत 15 दिवसाला आढावा घेतला जाणार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारूनच हे आपण करत असल्याचे शिष्टमंडळ सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी विचारुनच ही सगळी कार्यवाही करायला लावली आणि देवेंद्र फडणवीसांनी याला होकार दिला, अशी माहिती शिष्टमंडळाने दिल्याचं मनोज जरांगे म्हणाले.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

अनेक विषय राज्य सरकारकडून मान्य झाले. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्या समाज बांधवांना आरक्षण देण्याची भूमिका घेतली होती. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी नेहमीच पुढाकार घेतला, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. तसेच मनोज जरांगे यांनी सुचवलेल्या सुधारणा आम्ही केल्या आहेत. त्याच्यावर आता लगेच आम्ही पुढच्या दोन-तीन दिवस शासन निर्णय काढून सुरुवात करणरा आहोत.

मनोज जरांगेंच्या कोणकोणत्या मागण्या मान्य…
58 लाख नोंदींचे दस्तावेज जरांगेंना दिले जाणार
नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्रे देणार
जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसांत बैठक घेणार
सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी एक महिना वेळ
न्या.शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ
प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन
आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे-पाटलांचीही स्वतंत्र हेल्पलाईन
मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार

मनोज जरांगे यांचे 40 डिग्रीच्या उन्हात उपोषण सुरु; पाहा मागण्या…

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी घेतला टोकाचा निर्णय…

महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले: ठाकरेंना धक्का, राष्ट्रवादीत वाद, जरांगेंना धमकी, शिंदे–नाईक वाद तीव्र

…तर धन्याइतका नीच माणूस पृथ्वीतलावर असूच शकत नाही: मनोज जरांगे

मनोज जरांगे यांचं सरकारला पत्र; माझं पोलिस संरक्षण काढा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *