बारामतीमध्ये नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; घरात प्रवेश केला अन्…

political-leader
Share

पुणे : बारामतीमध्ये एका नगरसेवकाने महिलेशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान नगरसेवक किशोर मासाळ यांच्याविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

एका 45 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून किशोर आप्पासाहेब मासाळ यांच्याविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, महिलेच्या फिर्यादीनंतर बीएनएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 फेब्रुवारी 2026 ते 25 मे 2026 या कालावधीत आरोपीने फिर्यादी महिलेशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिच्या राहत्या घरी अनधिकृत प्रवेश केल्याचा आरोप आहे. तसेच वेळोवेळी अश्लील स्वरूपाच्या मागण्या करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या ओळखी व प्रभावाचा धाक दाखवत धमक्या दिल्या. तसेच फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी देत आर्थिक लाभ मिळवून देण्याची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आरोपीने महिलेचा पाठलाग करून तिला मारहाण केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 253/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 332(c), 74, 75, 78, 115(2), 352 आणि 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल; बळजबरी ठेवले शारीरिक संबंध…

मनसे नेत्याचं महिलेसोबत अश्लील वर्तन, गुन्हा दाखल…

राजकारणात खळबळ! अनैतिक संबंधाच्या संशयातून नगरसेविकेकडून अपहरण अन्…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *