मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात टेंडरवरून वाद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. छगन भुजबळ यांच्याकडे असलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागानं वाहतूक टेंडर काढलं होतं. दरम्यान, पार्थ पवार यांनी एका ठेकेदाराला ते कंत्राट देण्यासाठी आग्रह धरला. मात्र भुजबळांनी त्याला विरोध केला आणि त्यातूनच त्यांचा पार्थ पवारांशी वाद झाल्याची चर्चा आहे.
या कथित वादावर भुजबळ यांनी सूचक प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, ‘काही गोष्टी समजुतीने करायच्या असतात. याचा अर्थ आमच्यात वाद झाला असा होत नाही. पार्थ पवार यांच्या विषयी जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत, असं काहीही झालं नाही.’

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यस्तरावरील एक टेंडर ठरावीक ठेकेदाराला द्यावं, असं म्हणत पार्थ पवारांनी ठेकेदाराला वाहतुकीचं टेंडर देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठवलं होतं. मात्र भुजबळांनी टेंडर द्यायला नकार दिला. टेंडर देता येणार नाही, याची कारणंही भुजबळ यांनी सांगितली. याच मुद्यावरून दोघांमध्ये वाद झाला. ‘तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनीही कधी अशा पद्धतीने मला सांगितले नव्हते’, अशा शब्दात भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर, ‘मला तुमच्याकडचा विभाग काढून घ्यावा लागेल’, अशा शब्दात पार्थ पवार भुजबळांवर संतापल्याचे सांगितलं जात आहे. या बातमीमुळे राज्यभरात चर्चेला उधाण आलं. कारण आधीच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत राष्ट्रवादीतील तरूण नेत्यांचे खटके उडत असल्याच्या बातम्या सातत्यानं येत आहेत. आता भुजबळ यांचेही नाव समोर आले आहे.
पुणे जिल्ह्यात छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक…
अजितदादा विमान अपघात! छगन भुजबळांची शंका; म्हणाले, मलाही आश्चर्य वाटलं की…