पुणे: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री हे महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे येत होते. मात्र, हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी पायलटने ते थेट कार पार्किंगच्या जागेत उतरवल्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कार्यक्रमासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. तरीही, खानवडी गावात पोहोचलेल्या हेलिकॉप्टरच्या पायलटला कार पार्किंगमधील मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचा भास झाला आणि त्याने तिथेच लँडिंग केले. या अनपेक्षित प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. पार्किंगमध्ये काही वाहने उभी असली तरी कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची नोंद नाही.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
पोलिसांनी तातडीने पायलटला योग्य माहिती दिल्यानंतर हेलिकॉप्टर तिथून हलवण्यात आले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. योग्य नियोजन असतानाही चुकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवणे अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे. हेलिपॅड स्पष्ट दिसत होते का, पायलटकडून नेमकी चूक कशी झाली किंवा काही तांत्रिक अडचण होती का, याचा तपास केला जाणार आहे. या घटनेनंतरही मंत्री छगन भुजबळ सुरक्षित असून त्यांनी आपला पुढील कार्यक्रम नियोजनानुसार पूर्ण केला. मात्र, या प्रकारामुळे सुरक्षा आणि समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
अजितदादा विमान अपघात! छगन भुजबळांची शंका; म्हणाले, मलाही आश्चर्य वाटलं की…
अजितदादांच्या विमान अपघातबद्दल मुख्यमंत्र्यांचा नवा खुलासा…
रोहित पवार यांच्याकडून विमान अपघात अहवालाची चिरफाड; विमानाची रेकी…
अजितदादांच्या विमान अपघातानंतर एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय…