राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच वाजलं बिगुल; पाहा कधी मतदान…

gram-panchayat
Share

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये थेट सरपंचपदासाठी 471 आणि 3120 सदस्य रिक्त जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. सध्या गावगावात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे आहे.

अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या अन् गावागावात निवडणुकांचा धुरळा उडू लागला आहे. ग्रामपंचायत सदस्यपदांच्या तसेच सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी मतदान होणार आहे. 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

पाहा कसा आहे निवडणूक कार्यक्रम…
नामनिर्देशनपत्रे 7 ते 13 एप्रिल 2026 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 15 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे 17 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 29 एप्रिल 2026 रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे.

कुठे कुठे होणार निवडणूक…

अ.क्र. जिल्हा एकूण ग्रामपंचायतींची संख्या थेट सरपंच रिक्त जागांची संख्या सदस्य रिक्त जागांची संख्या
एकूण रिक्त जागांची संख्या
1 ठाणे 78 15 101 116
2 पालघर 127 15 168 183
3 रायगड 127 30 170 200
4 रत्नागिरी 114 14 160 174
5 सिंधुदुर्ग 105 12 143 155
6 नाशिक 133 12 191 203
7 धुळे 47 11 47 58
8 जळगाव 81 13 92 105
9 अहिल्यानगर 64 5 85 90
10 नंदुरबार 67 10 70 80
11 पुणे 155 33 226 259
12 सोलापूर 35 13 34 47
13 सातारा 138 34 172 206
14 सांगली 82 21 93 114
15 कोल्हापूर 100 39 89 128
16 छत्रपती संभाजीनगर 32 6 37 43
17 बीड 81 16 72 88
18 नांदेड 82 22 143 165
19 धाराशिव 25 9 23 32
20 परभणी 20 6 16 22
21 जालना 36 11 28 39
22 लातूर 60 10 58 68
23 हिंगोली 9 3 11 14
24 अमरावती 69 11 98 109
25 अकोला 76 13 126 139
26 यवतमाळ 47 4 86 90
27 वाशिम 51 14 49 63
28 बुलडाणा 59 11 72 83
29 नागपूर 86 18 95 113
30 वर्धा 27 3 38 41
31 चंद्रपूर 39 3 53 56
32 भंडारा 65 15 63 78
33 गोंदिया 69 15 69 84
34 गडचिरोली 58 4 142 146
एकूण 2444 471 3120 3591

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *