मुंबईः राज्यात केवळ दुधाच्या पनीरच्या उत्पादनाला परवानगी असून, कोणालाही व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली नाही. उच्च न्यायालयाने देखील आमच्या कामाची स्तुती केलेली आहे. प्रत्येकाला सुधारणा नोटीस देणं अपेक्षित नाही. 80 टक्के आस्थापना योग्य स्थितीत होत्या त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. कायद्याचं पालन करणाऱ्यांना भिती बाळगण्याच कारण नाही, असे मत राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.
विशेष तपासणी मोहिम राबवणार असल्याची माहिती देखील मुंढेंनी दिली. संशयित उत्पादनांचे नमुने घेऊन पुढील कारवाई होईल. सगळ्या अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्राहकांना ओरीजनल पनीर मिळावं पॅकिंगवरील सगळे नॉर्म पाळले गेले पाहिजेत. संशय आल्यास लोकांनी टोल फ्री क्रमांकवर तक्रार करावी. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही. ॲनालॉग पनीरवर बंदी आणणार महाराष्ट्र पहिलं राज्य असू शकेल, असेही मुंढे म्हणाले.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
सुधारणा नोटीस न देता थेट परवाना रद्द करतो, असे म्हणणे चुकीच आहे आकडेवारी स्पष्ट असल्याचे मुंढे म्हणाले. जिथे फूड सुरक्षित नव्हतं लोकांच्या जीवाला धोका होता तिथेच फक्त परवाना जप्तीची कारवाई झाली. जो कारवाईशी संतुष्ट नाही त्याने माझ्याकडे अपील करायला हवी हेच कायदा सांगतो असंही ते म्हणाले. 165 पैकी 103 अपील केलं आहे. उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय त्यांच्याकडे आहे. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत, फोटो व्हिडिओ आहेत, असेही मुंढे यावेळी म्हणाले. कायदेशीर रीत्या आम्ही बरोबर आहोत असेही मुंढे म्हणाले.
दुग्धजन्य पदार्थांच्या कारवायांमध्ये 487 आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. तर 218 सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. 33 जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. एकूण 11 एफआयआर दाखल झाल्याची माहिती देखील मुंढे यांनी दिली. आतापर्यंत 55.72 कोटी रुपयांचा एकूण 28, 66, 096 किलो माल नष्ट करण्यात आला आहे. 890 हॉटेलची तपासणी केली आहे. 329 सुधारणा नोटीस बजावल्या आहेत. 116 परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती मुंढे यांनी दिली आहे. 25 मे पासून 31 जुलैपर्यंत राज्यात 3137 आस्थापनाची तपासणी केली आहे. सुधारणा नोटीस 764 परवाना निलंबन 165 झाले आहे.
तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी; मंत्र्याकडे लेखी तक्रार…
पुण्यात तुकाराम मुंढे यांची मोठी कारवाई; 24 तासात 10 परवाने निलंबित…
तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; FDAची मोठी कारवाई अन् दुकान सील…
हॉटेलधारकांनो ग्राहकांसमोर लगेच पाण्याच्या बाटल्या ठेवू नका; तुकाराम मुंढे
मोठी खळबळ! तुकाराम मुंढे यांची विकेट काढण्यासाठी 250 कोटींची सुपारी…