पुणे: पुण्यातील विविध हॉटेल्स आणि बेकरींवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील नामांकित ‘गोल्डन बेकरी’सह पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील एकूण १० बेकरी आणि हॉटेल्सचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. गुरुवार आणि शुक्रवारी करण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणारे आणि अस्वच्छता ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सर्व बेकरी, डेअरी आणि हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा मानके कायद्याचे (FSSAI) सर्रास उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले आहे. तपासणी दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि गलिच्छ वातावरण आढळून आले. एफडीएने या कारवाईदरम्यानचे काही फोटोही प्रसिद्ध केले असून, यामध्ये नागरिकांचे आवडते खाद्यपदार्थ किती घाणेरड्या आणि अस्वच्छ जागेत तयार केले जात होते, याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
पुण्याच्या कोंढवा येथील गोल्डन बेकरी, येवलेवाडीतील गोल्डन मॅजेस्टिक बेकरी, मंगळवार पेठेतील स्टार केटरिंग सर्व्हिस, सोमवार पेठेतील अशोक बार अँड रेस्टॉरंट आणि बाणेर परिसरातील बिकांगे बिर्यानी एलएलपीवर एफडीएने तातडीची कारवाई करत सर्वच आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. ही परवाने निलंबनाची कारवाई केवळ पुणे शहरातच नव्हे, तर पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील काही आस्थापनांवरही करण्यात आली आहे. यात पुणे जिल्ह्याच्या अंबेगाव तालुक्यातील पारगाव पेठ येथील सिद्धार्थ ॲग्रो – डेअरी, महाबळेश्वरमधील सह्याद्री रेस्टॉरंट अँड ढाबा आणि सिगडी रेस्टॉरंट, कोल्हापूरच्या करवीर येथील व्हीबीजीओआर शाळा कॅन्टीन, तसेच सांगलीतील हलद भवन कॅन्टीनचे परवाने देखील रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान, तपासणी मोहिमेत या सर्व ठिकाणी स्वच्छतेच्या मूलभूत निकषांचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अशा कोणत्याही बेजबाबदार आस्थापनांची गय केली जाणार नाही, असा इशारा एफडीए प्रशासनाने दिला असून आगामी काळातही ही तपासणी मोहीम अशीच तीव्र राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.
तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; FDAची मोठी कारवाई अन् दुकान सील…
तुकाराम मुंडे यांच्या FDAला हायकोर्टाचा मोठा दणका…
तुकाराम मुंढे यांची मुंबईतील ६ मोठ्या हॉटेल्सकारवाई; थेट परवाने रद्द…
तुकाराम मुंढे यांचा ॲमेझॉन इंडियाला मोठा दणका; थेट गोदामाचा परवाना रद्द…
हॉटेलधारकांनो ग्राहकांसमोर लगेच पाण्याच्या बाटल्या ठेवू नका; तुकाराम मुंढे