तुकाराम मुंढे यांचा ॲमेझॉन इंडियाला मोठा दणका; थेट गोदामाचा परवाना रद्द…

tukaram-mundhe
Share

मुंबईः अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी तालुक्यातील सरवली येथील ‘ॲमेझॉन रिटेल इंडिया’ (Amazon Retail India) या नामांकित कंपनीच्या गोदामावर अन्न सुरक्षा पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुदतबाह्य झालेले आणि मानवी आरोग्यास घातक ठरणारे अन्नपदार्थ नष्ट न करता, नागरिकांची दिशाभूल करून ते पुन्हा विक्रीसाठी अन्नसाखळीत वळवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ॲमेझॉन रिटेलच्या फॅसिलिटी मॅनेजरसह दोघांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरवली येथील ‘ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.’ आणि ‘आर. के. ट्रेडर्स’ यांच्या संगनमताने मुदतबाह्य झालेले अन्नपदार्थ नष्ट न करता ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याची खात्रीशीर माहिती अन्न सुरक्षा पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी मध्यरात्री पथकाने या गोदामावर अचानक धाड टाकली. या कारवाईदरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले. ‘मे. आर. के. ट्रेडर्स’चे मालक रहमान के. यांनी कराराचे पालन न करता, हे मुदतबाह्य अन्नपदार्थ नष्ट केल्याचे खोटे विल्हेवाट प्रमाणपत्र सादर केले होते. प्रत्यक्षात मात्र, हे मानवी आरोग्यास घातक ठरू शकणारे अन्नपदार्थ बाजारात पुन्हा विक्रीसाठी पाठवले जात होते. या संपूर्ण काळ्या बाजारात ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि. चे कालबाह्य व खराब अन्नपदार्थ विल्हेवाट हाताळणारे संबंधित कर्मचारी आणि पश्चिम क्षेत्राचे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नूर हे थेट सामील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद वसंत कांडेलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात ‘मे. आर. के. ट्रेडर्स’चे मालक रहमान के. आणि ‘ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.’चे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नूर या दोघांविरोधात गुन्हा (FIR) नोंदवण्यात आला आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे अन्नपदार्थांचा काळा बाजार करणाऱ्या माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सरवली (भिवंडी) येथील ज्या अमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.च्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली, त्या विशिष्ट आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. मुदतबाह्य व खराब अन्नपदार्थांची विल्हेवाट लावण्याऐवजी ते पुन्हा विक्रीसाठी वळवल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, हा निर्णय केवळ संबंधित गोदामाच्या परवान्यापुरताच लागू आहे.

हॉटेलधारकांनो ग्राहकांसमोर लगेच पाण्याच्या बाटल्या ठेवू नका; तुकाराम मुंढे

मोठी खळबळ! तुकाराम मुंढे यांची विकेट काढण्यासाठी 250 कोटींची सुपारी…

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्याकडून महत्त्वाची जबाबदारी घेतली काढून…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *