पुणे : अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका असून आधी त्यांनी स्वतःच्या मुलाचा पराक्रम पाहावा आणि नंतर आमच्यावर टीका करावी. अजित पवार हे स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आले आहेत, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.
महेश लांडगे म्हणाले, ‘आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम पाहा आणि ते स्वतः आका आहेत, हे त्यांनी जाहीर करावे. ते मला पिंपरी चिंचवडचा आका म्हणत आहेत, मुळात अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका आहेत. सध्या अजित पवार यांचा अहंकार बोलतोय, ते नैराश्यात आहेत.’ अजित पवार यांना आमदार महेश लांडगे यांनी राजकीय कुस्तीचं आव्हान दिले आहे. त्यामुळं आता खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवडच्या आखाड्यात पूर्वीचे वस्ताद अजितदादा विरुद्ध पैलवान महेश लांडगे अशी लढाई सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
‘स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्या अजित पवारांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करु नयेत. मुलगा पार्थ पवारांचे पराक्रम पाहा. जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी चिंचवडचे होतील का? आमच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करायचे असतील तर मी, पालिका प्रशासन आणि अजितदादांनी समोरासमोर बसावे. मग सर्व उत्तर मिळतील, असे आव्हान महेश लांडगे यांनी दिले.
दरम्यान, महेश लांडगे यांच्या टीकेवर बोलताना अजित पवार म्हणाले की, मी कोण आहे जनता ठरवेल. 15 तारखेपर्यंत कळ काढा उत्तर देतो. राष्ट्रवादीकडून एक अलार्म पाच काम हे कॅंपेन सुरू होत आहे. पुण्यातील खड्डे, कचरा , गुन्हेगारी, पाणीटंचाई या मुद्द्यांवर रॅप सॉंगमधून भाजपच्या कारभारावर टीका करण्यात आली आहे. हे गाणं पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या कारभाराबद्दल आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभाराबाबत हे नसल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कचरा , वाहतूक कोंडी, तुटलेले रस्ते, पाणीटंचाई , गुन्हेगारी हे पुण्याचे अलार्म आहेत असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. आपण जे गाणं तयार केलं आहे ते पुणे आणि पिंपरी चिंचवडपुरते मर्यादित आहे. केंद्र आणि राज्य सरकार याचा कुठेही संबंध नाही असे अजित पवार म्हणाले. पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिले जाते त्याचा फटका नागरिकांना बसतो, असेही अजित पवार म्हणाले.