मुंबईः नागपूरचे पोलिस आयुक्त आणि IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. एका सरकारी नोकरीत असलेल्या, त्यातही अत्यंत जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने अशा कार्यक्रमात जाऊन एका विशिष्ट संघटनेबद्दल जाहीरपणे निष्ठा दाखवणे कितपत योग्य आहे, असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. नांगरे पाटील यांनी दाखवलेली ही दुहेरी निष्ठा त्यांच्या निष्पक्षतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून जर त्यांना संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल, तर त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन भाजप किंवा संघात सामील व्हावे, असे म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती केली आणि त्यावरुन राजकीय वाद सुरू झाला आहे. यावरुन काँग्रेस देखील आक्रमक झालं असून खाकी वर्दीतला अधिकारी की संघाचा प्रचारक? असा सवाल मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
अशा प्रकारच्या राजकीय हेतू असलेल्या संमेलनांमध्ये पोलीस अधिकार्यांचे जाणे आणि सत्ताधाऱ्यांनी त्यावर मौन बाळगणे हे भविष्यासाठी अत्यंत चुकीचे पायंडे पाडणारे आहे. २०१२ मध्ये मनसेच्या मोर्चात पोलिसांचे अभिनंदन करणाऱ्या एका कॉन्स्टेबलला तत्कालीन सरकारने तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवले होतं, मग तोच नियम नांगरे पाटील यांना का लागू केला जात नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे…
”आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत. आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं. नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन (अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना ‘आमच्याकडे या’ म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात, तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !”
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक…
— Raj Thackeray (@RajThackeray) June 27, 2026
तुमची ‘मन की बात’ खूप झाली; राज ठाकरेंचं नरेंद्र मोदींना धडधडीत पत्र; चुका तुमच्या अन् भुर्दंड…
अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांनी घेतली उडी…
मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरे यांचे काळजाला साद घालणारं आवाहन…