जळगाव : जळगावचे माजी खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उन्मेश पाटील यांच्याविरोधात रविवारी (ता. २८) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध जाहीर भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अदखलपात्र स्वरुपाचा गुन्हा दाखल केला आहे. जळगावचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी याबाबतची माहिती दिली.
चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याबाहेर २८ जून रोजी एका प्रकरणात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात माजी खासदार उन्मेष पाटील हे उपस्थित होते. आंदोलकांना संबोधित करताना त्यांनी तेथील पोलिस उपनिरीक्षक (PSI) संदीप घुले यांच्यावर गंभीर आरोप केले. आरोप करत असताना उन्मेष पाटील यांनी पीएसआय घुले यांच्याविषयी अत्यंत बदनामीकारक, अपशब्द आणि शिवीगाळ केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
आपल्या जाहीर भाषणात उन्मेष पाटील यांनी पोलिस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले. पीएसआय घुले हे निष्पाप तरुणांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नाहक त्रास देत आहेत. तसेच ते एका महिला पोलिस कर्मचाऱ्याकडेच शरीरसुखाची मागणी करत असल्याचा खळबळजनक आरोप पाटील यांनी जाहीर भाषणातून केला. हे आरोप करताना उन्मेष पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्याला थेट शिवीगाळ केली. याचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
पोलिस अधिकाऱ्याची बदनामी आणि शिवीगाळ केल्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याच्या गोपनीय शाखेतील एका पोलिस कर्मचाऱ्याने याप्रकरणी अधिकृत तक्रार दिली. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३५२ आणि ३५६(३) अंतर्गत माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याविरोधात अशाप्रकारे गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.