भाजपचे माजी आमदार अन् बडतर्फ पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल; युवतीवर अत्याचार…

Share

मुंबईः कल्याण शहरात मदत करण्याच्या बहाण्याने पिडीत युवतीस आपल्या कार्यालयात बोलावून तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांच्या विरोधात पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पिडीत विवाहित युवती (वय २२) हिचा पती सोबतवाद असल्याने त्या वादात मध्यस्ती करण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तिला आपल्या कार्यालयात बोलावले होते. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी माजी आमदार नरेंद्र पवार व त्यांचा साथीदार बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांनी तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे आपल्या खाजगी मालमत्ता येथे घेऊन येत तिला शस्त्राचा धाक दाखवून दारू पाजून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. रात्री दोन वाजता माजी आमदार नरेंद्र पवार तेथून निघून गेल्यानंतर शैलेश पाटील याने सुद्धा या पिडीत युवतीवर अत्याचार केल्यानंतर पहाटे चार वाजता शैलेश पाटील यांच्या घरचा केअर टेकर याने पिडीत तरुणीला तिच्या घरी आणून सोडले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, घाबरलेल्या पिडीत युवतीने 16 सप्टेंबर रोजी काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याकडे मदत मागितली. तेव्हा तरुणीने आपल्यावर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील याने अत्याचार केल्याचे व त्या संबंधी आपल्याकडे व्हिडिओ व मोबाईल व्हॉट्सॲप चॅट असल्याचे दाखविले. त्यानंतर पिडीत तरुणीला घेऊन रात्री कांचन कुलकर्णी पडघा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. तेथे पहाटे माजी आमदार नरेंद्र पवार व शैलेश पाटील या दोघांविरोधात सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी मला आता न्याय द्यावा, यांनी अशा पद्धतीने किती महिलांचे आयुष्य उध्वस्त केले असेल. त्यामुळे यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी पिडीत तरुणीने केली आहे. पिडीत तरुणीने माझ्या इंस्टाग्राम अकाऊंडवरील मोबाईलवर संपर्क साधून मदत मागितली. मी तिला भेटले असता तिने जी घृणास्पद हकीकत सांगितली ती ऐकून माझ्या पायाखालची जमीन हादरली. तिच्या जवळील व्हिडिओ व मोबाईल चॅट बघितल्यानंतर मी तत्काळ पिडीत तरुणीला घेऊन रात्री पडघा पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिस महासंचालक सदानंद दाते यांना रात्री संपर्क केल्यानंतर त्यांनी पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. अशी माहिती काँग्रेस नगरसेविका गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी दिली.

पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिर यांनी रात्री उशिरा सर्व खातरजमा करून शस्त्राचा धाक दाखवून सामूहिक अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परंतु ही घटना अत्यंत निंदनीय, काळिमा फासणारी असून देशात आणि राज्यात लाडकी बहीण म्हणून डांगोरा पिटणाऱ्या भाजपचा माजी आमदार अशा पद्धतीने कृत्य करीत असेल तर त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तर शैलेश पाटील हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर परदेशी महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी तर स्वतःच्या आईला शस्त्राचा धाक दाखवून तिच्या नावे असलेली जमीन आपल्या नावे करून बळकावली प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. यांना 48 तासात अटक न झाल्यास हजारो महिलांना सोबत घेऊन पडघा पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करू असा इशारा काँग्रेस नगरसेविका गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे.

पोलिस अधिकाऱ्याची महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणीचे वक्तव्य; शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल…

पुण्यातील कोंढव्याबाबत भाजप पदाधिकाऱ्याचा वादग्रस्त वक्तव्य, गुन्हा दाखल…

भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल; बळजबरी ठेवले शारीरिक संबंध…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!