संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com
पुणे (संतोष धायबर): पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात महिला कर्मचाऱ्यांनी सामूहिक छळाची तक्रार केल्यानंतर खळबळ उडाली आहे. तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या आणि अनिश्चितकालीन रजेवर पाठविण्याचे आदेश दिले आहेत. महाविद्यालयात अनेक गंभीर प्रश्न असून, सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात अनेक गंभीर प्रश्न असून, पत्रकार संतोष धायबर यांनी बातम्यांच्या माध्यमातून समोर आणले आहेत.
महाविद्यालयातील चार महिला कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर वारंवार त्रास देणे, विनाकारण केबिनमध्ये बोलावून तासन्तास थांबवणे, कामात अडथळे निर्माण करणे आणि मानसिक छळ करणे असे आरोप केले आहेत. तसेच त्यांनी व्हॉट्सअॅपवर वैयक्तिक व अयोग्य संदेश पाठवल्याचाही आरोप केला आहे. असे प्रकार वारंवार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता सुनिता सांवत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या आणि अनिश्चितकालीन रजेवर पाठविण्याचे आदेश दिले आहेत. महिला कर्मचाऱ्यांनी पुणे महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, महापौर आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनाही लेखी तक्रार दिली आहे. तक्रारीत कार्यस्थळ महिलांसाठी असुरक्षित झाल्याचा आरोप करण्यात आला असून, तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवून स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशाखा मार्गदर्शक तत्त्वांनुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले आहे. चार महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या छळाच्या आरोपांनंतर पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून, चौकशीदरम्यान त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
View this post on Instagram
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात सावळागोंधळ…
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय नेमके कोणाचे? खासगी की सरकारी?
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासकीय गोंधळामुळे चर्चेत!
पुणे शहरात दोन महिन्यात साडेसहा हजार जणांना चावले श्वान!
बातमीची तत्काळ दखल! पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावरील कुंड्यांना मिळाले ‘जीवदान’
पुणे महापालिकेच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिक संतप्त; हरित शहराचा फाटला बुरखा…
@PMCPune @mohol_murlidhar @Dev_Fadnavis @supriya_sule @mieknathshinde @SunetraA_Pawar @RRPSpeaks @CMOMaharashtra @PMOIndia @SantoshDhaybar pic.twitter.com/ZskJYgQmCD
— mahabharat news (@mahabharatnewss) June 5, 2026