संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com
पुणे (संतोष धायबर): देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक हरित शहर म्हणून ओळख मिळवलेल्या पुणे शहराच्या प्रतिमेला काळिमा फासणारे चित्र पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाहायला मिळत आहे. पुणे शहराला ‘हरित शहर’ म्हणवून घेणाऱ्या प्रशासनाच्याच मुख्य दारात कुंड्यांमधील झाडे पाण्याअभावी जळून, कोमेजून चालल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सजावटीसाठी ठेवण्यात आलेल्या अनेक कुंड्यांतील झाडे वाळून चालेलली दिसत आहेत. काही झाडांची पाने करपली असून, अनेक कुंड्यांमध्ये माती कोरडी पडली आहे. शहर सौंदर्यीकरण, हरित उपक्रम आणि पर्यावरण संवर्धनाच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाच्या दारातच अशी अवस्था दिसत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
विशेष म्हणजे, पुणे शहराचे वरिष्ठ अधिकारी, प्रशासकीय कारभारी, विविध विभागांचे प्रमुख आणि लोकप्रतिनिधी याच मुख्य प्रवेशद्वारातून दररोज ये-जा करतात. प्रवेशद्वार परिसरात सुरक्षा रक्षकांची मोठी फौज कायम तैनात असते. तरीदेखील या वाळलेल्या झाडांकडे कोणाचेही लक्ष गेले नाही, ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे.
‘शहर हरित करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जातो, विविध अभियानांची जाहिरात केली जाते. मात्र, महापालिकेच्या दारातील झाडांनाच पाणी मिळत नसेल तर शहरातील इतर भागांची अवस्था काय असेल?’ असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. मुख्य प्रवेशद्वारावरील या कुंड्यांना शेवटचे पाणी नेमके कधी घालण्यात आले? त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाकडे आहे? संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष का केले? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराची ही अवस्था म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शहराच्या विकासासाठी आणि सौंदर्यीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात असताना, प्रत्यक्षात मूलभूत देखभालीकडेच दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. दरम्यान, या प्रकारानंतर संबंधित विभागावर कारवाई होणार का? तसेच मुख्य प्रवेशद्वारावरील झाडांना तातडीने जीवदान मिळणार का? याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
पुणे महापालिकेच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिक संतप्त; हरित शहराचा फाटला बुरखा…https://t.co/rHMAFnyUhw@PMCPune @GaneshBidkarBJP @mohol_murlidhar @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar pic.twitter.com/zzoWlKxinn
— mahabharat news (@mahabharatnewss) May 18, 2026
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात सावळागोंधळ…
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय नेमके कोणाचे? खासगी की सरकारी?
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासकीय गोंधळामुळे चर्चेत!