भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासकीय गोंधळामुळे चर्चेत!

Atal-Bihari-Vajpayee-Medical collage pune
Share

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com
पुणे : पुणे महापालिकेच्या अखत्यारितील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा एकदा प्रशासकीय गोंधळामुळे चर्चेत आले आहे. महाविद्यालयाच्या डीन पदावरील तडकाफडकी बदलीमुळे वैद्यकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, या निर्णयामागील नेमके कारण काय? याबाबत मात्र अधिकृत स्तरावर मौन पाळले जात आहे. दरम्यान, डॉ. शिल्पा आ. प्रतिनिधी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, डॉ. सुनीता सावंत यांच्याकडे अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. महाविद्यालयातील प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यातच अधिष्ठात्यांच्या बदल्याचा निर्णय अचानक घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, अधिष्ठातापदाच्या अतिरिक्त कार्यभारासंदर्भात तब्बल तीन वर्षे नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती करण्यात आल्याची बाब समोर आल्याने महापालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका होत आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

याआधीच्या अधिष्ठात्यांवर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत लाच घेतल्याच्या आरोपांवरून कारवाई करण्यात आली होती. त्या घटनेनंतरही कायमस्वरूपी अधिष्ठाता नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेला घेता आलेला नाही. परिणामी, ‘अतिरिक्त कार्यभार’ या तात्पुरत्या व्यवस्थेवरच महाविद्यालयाचा कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी अखेर या प्रकरणाची दखल घेत गोंधळ दूर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सुरुवातीपासूनच चुकीची नियुक्ती कशी झाली आणि ती दुरुस्त करण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी का लागला, जीआरची अंमलबजावणी होत आहे का? वैद्यकीय महाविद्यालय नेमके चालवते कोण? याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वैद्यकीय शिक्षणासारख्या गंभीर आणि संवेदनशील क्षेत्रातही महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर येत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. ‘उशिरा का होईना, प्रशासनाला नियम आठवले,’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही पुढे येत आहे.
(क्रमशः)

पुणे शहरात दोन महिन्यात साडेसहा हजार जणांना चावले श्वान!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *