मुंबई: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार) दुपारी जाहीर होणार आहे. आज दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आणि अन्य वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येईल. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे गुण दिसतील. विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका शाळेतून मिळेल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधील विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट पुढील प्रमाणे..
https://sscresult.mahahsscboard.in/
https://results.targetpublications.org/
https://results.digilocker.gov.in
निकाल पाहण्यासाठी वरीलपैकी कोणत्याही एका संकेतस्थळावर जा. (उदा. mahresult.nic.in). त्यानंतर ‘SSC Examination March 2026 Result’ या लिंकवर क्लिक करा. त्यामध्ये आवश्यक माहिती भरा. तुमचा दहावीचा सीट नंबर (Seat Number) टाका. आईचे नाव: रकान्यात तुमच्या आईच्या नावाचे पहिले नाव (Mother’s First Name) इंग्रजीत टाका. निकाल पाहण्यासाठी ‘View Result’ बटणावर क्लिक करा.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
ऑनलाईन संकेतस्थळांशिवाय तुम्हाला दहावीचा निकाल मोबाईल एसएमएसवर ही पाहता येऊ शकतो. त्यासाठी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन MHSSC Seat Number टाइप करा आणि तो 57766 या क्रमांकावर पाठवा. DigiLocker: digilocker.gov.in वर ‘SSC Result’ सेक्शनमधून तुमची गुणपत्रिका डाउनलोड करू शकता. वेबसाईट चालू नसेल तर: sscresult.mkcl.org किंवा results.targetpublications.org यांसारख्या इतर वेबसाईटचा वापर तुम्ही करु शकता.
ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी )परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंबकरून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.