विधानसभा–विधानपरिषद आमदारांचा लंडन दौरा; १५ आमदारांचा अभ्यास दौऱ्यात समावेश

Share

मुंबई: राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांचा लंडन दौरा आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात लंडनमधील प्रशासकीय कामकाज, शहरी व्यवस्थापन तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा यांचा अभ्यास केला जाणार आहे. विशेष म्हणजे या अभ्यास दौऱ्यात एकूण १५ आमदारांचा समावेश असणार आहे.

महापालिका निवडणुकांनंतर सध्या राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच हा परदेश दौरा आयोजित करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अभ्यास दौरा १५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे.

या दौऱ्यात लंडनमधील शहरी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. विधिमंडळाच्या कामकाजात या अनुभवाचा उपयोग करण्याचा उद्देश या दौऱ्यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या आमदारांमध्ये भाजपकडून विक्रांत पाटील आणि निरंजन डावखरे, शिवसेनेकडून मनीषा कायंदे तर ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

लंडन दौऱ्यावर जाणारे आमदार

बाबासाहेब देशमुख

परिणय फुके

विक्रम पाचपुते

नमिता मुंदडा

निरंजन डावखरे

स्नेहा दुबे

विक्रांत पाटील

अमित गोरखे

विक्रम काळे

विश्वजीत कदम

वरुण सरदेसाई

मनीषा कायंदे

सुमित वानखेडे

योगेश टिळेकर

सूत्रांच्या माहितीनुसार, वरील सर्व आमदार प्रशासकीय कामकाजाच्या अभ्यासासाठी लंडनला रवाना होणार असून उर्वरित आमदारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *