एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार

yugendra-pawar
Share

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज (गुरुवार) बारामतीत पोटनिवडणूक होत असून पवार कुटुंब या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले. शरद पवार आज स्वत: मतदानाला उपस्थित नसले तरीही त्यांनी सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन बारामतीकरांना केले आहे. त्यामुळे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात असलेले पवार कुटुंब या निवडणुकीत एकत्र दिसून आले. मात्र, 2029 च्या निवडणुकीची देखील चर्चा या अनुषंगान होत आहे. त्यातच, युगेंद्र पवार यांनी 2029 च्या निवडणुकीसंदर्भाने मोठं वक्तव्य केले आहे.

रोहित पवार यांनी 2029 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्यावर युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका मांडली. 2029 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात, जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते असे जे रोहित पवार म्हणाले ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. यापूर्वी लोकसभेला आणि विधानसभेला पवार विरुद्ध पवार असे एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख आहे. पण, आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलेलो आहेत. आता पवार विरुद्ध पवार लढाई नको, तशी आमची इच्छाही नाही, अशा शब्दात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे युगेंद्र पवार यांनी परखडपणे भूमिका मांडली.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

जय पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना, 2029 मध्ये मी विधानसभेचा उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. पण मला कार्यकर्ता म्हणून काम करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. कार्यकर्ते आणि पक्षाची इच्छा असते, ते ऐकावं लागतं, त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाकडून जो कुठला निर्णय घेतला जाईल त्यावेळी सुनेत्रा काकी निवडणुकीला उभं राहणार नसतील तर, जे कोणी उभं राहील, 2029 ला तसं बघितलं तर सर्वपक्षीय लढाई होऊ शकते. बारामतीत भावनिक दृष्टीकोनातून निर्णय घेत आम्ही सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. पण आमचे पक्ष वेगळे आहेत. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते. जय पवार उमेदवार असतील तर इकडून युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात, असे रोहित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी रोहित पवार आणि जय पवार यांच्या वक्तव्यावर भूमिका मांडली. ते म्हणाले, दोघांनाही आज या क्षणी बोलायचं नाही गरज नव्हती, आणखी फार लांब जायचं आहे, आज फार महत्त्वाचा दिवस आहे, आपण सगळे पुढे होऊन दादासाठी सगळं करत आहोत, कोणीही विरोधात उभा राहिलेला नाही, आता मला वाटते की त्या गोष्टी बोलायची गरज नव्हती. आता, युगेंद्र पवार यांनीही वडिलांच्या सुरात सूर मिसळत रोहित पवारांचे मत वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे.

चर्चांना उधाण! बारामतीचा 2029 मध्ये उमेदवार कोण? जय पवार यांनी स्पष्ट सांगितलं…

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवार यांनी महत्वाचं विधान…

अजितदादांवरची चित्रफित पाहून सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात…

पार्थ पवार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…

रोहित पवार यांचे भुवया उंचावणारं वक्तव्य; पक्की माहिती शिकार होणार…

Video: पार्थ पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून शपथ! पण कार्यकर्त्यांचे पाणावले डोळे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *