पार्थ पवार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…

parth-ajit-pawar
Share

बारामती: बारामतीची निवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे होती. मात्र, काही लोकांनी मुद्दाम उमेदवारांना उभं केलं, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार पार्थ पवार त्यांनी म्हटले आहे. आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. उन्हात मतदारांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील, असे देखील पार्थ पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उद्या होणाऱ्या सांगता सभेवर देखील पार्थ पवार यांनी भाष्य केले आहे.

पार्थ पवार म्हणाले, अनेक लोकांची इच्छा होती की बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. परंतु, निवडणूक बिनविरोध झालेली नाही. काही लोक जे उभे राहिले आहेत, त्यांच्या अनेक मागण्या होत्या. काही प्रतिस्पर्धी उमेदवारांना मुद्दाम उभे केले आहे, असा मोठा दावा त्यांनी केला. पार्थ पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उद्या होणाऱ्या सांगता सभेच्या नियोजनाबाबत पार्थ पवार यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, सभेच्या स्थळाची पाहणी सुरू आहे. उद्या सांगता सभा होत आहे. इथे ऊन खूप आहे. राज्यभरातून अनेक लोक उद्या इथे येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, रामदास आठवले सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. मतदारांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. ऊन खूप आहे. उन्हात लोकांना कसं बाहेर काढायचं हा एक मोठा टास्क आहे. आम्ही चांगल्या मतांनी तर शंभर टक्के निवडून येणार आहोत. पण, आम्हाला दोन लाख 70 हजारांचा रेकॉर्ड मोडायचा आहे, असेही पार्थ पवार यांनी म्हटले आहे.

बारामतीत बॅनरची चर्चा! शरद पवार यांनी सांगूनही सुनेत्रा पवार यांनी नाही ऐकलं…

बारामतीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर निवडणुकीत 23 उमेदवारांचे आव्हान…

शरद पवार यांचे बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत मोठं विधान…

बारामतीमधील पानं-फुलंही दादांच्या आठवणीत रडत आहेत…

बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर; पाहा निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *