बारामतीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर निवडणुकीत 23 उमेदवारांचे आव्हान…

ajit-pawar-sunetra-pawar
Share

बारामती : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसने माघार घेतली आहे. काँग्रेसच्या माघारीनंतर सुनेत्रा पवार यांच्यासमोरील आव्हान संपेल असे वाटत होते. पण, 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुले बारामतीत मतदान होणार आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक लागली आहे. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेस पक्षासह 53 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात अॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. पण आज (गुरुवार) अॅड. आकाश मोरे यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली होती. यासोबत आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे यांनी ‘स्वराज्य शक्ती सेना’ या पक्षाच्या उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. साताऱ्यातील अभिजित बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पण अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी या दोघांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे अद्याप 23 उमेदवार अजूनही निवडणुकीच्या रिंगणात ठाम आहेत. त्यामुळे आता बारामतीत मतदान अटळ आहे. त्यामुळे येत्या काळात बारामतीच्या या रणधुमाळीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 ला निधन झाले होते.त्यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर या पोटनिवडणुकीचा निकाल हा 4 मे 2026ला जाहीर होणार आहे.

Video: पार्थ पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून शपथ! पण कार्यकर्त्यांचे पाणावले डोळे…

शरद पवार यांचे बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत मोठं विधान…

अजित पवार यांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या…

बारामतीत रणशिंग! अजित पवार यांचा वारसा सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार मैदानात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *