महागाईचा भडका! देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले; पाहा नवीन दर…

petrol
Share

नवी दिल्ली: देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असून, पेट्रोल 3 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 3.11 रुपये प्रति लीटर इतके महागले आहे. गेल्या काही दिवसांपासून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) वाढत्या किमतींचा परिणाम लवकरच देशांतर्गत ग्राहकांवर होईल, अशी चर्चा सुरू होती. अखेर, तेल कंपन्यांनी आजपासून (ता. 15 मे) इंधनाच्या किमतींमध्ये सुधारणा केली. आज (शुक्रवार) सकाळी 6 वाजल्यापासून, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे महगाईचा भडका उडणार असून, सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. इंधनाच्या दरवाढीनंतर अनेकांनी नाराजी उमटवली आहे. इंधनाचे दर वाढल्यानंतर महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये, नियमित पेट्रोलचा दर 94.77 रुपये प्रति लिटरवरून वाढून 97.77 रुपये झाला आहे. डिझेलचा दर 87.67 रुपये प्रति लिटरवरून वाढून 90.67 रुपये झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून स्थिर असलेल्या या दरांमध्ये आज लक्षणीय बदल झाला आहे. तेल कंपन्यांना होत असलेल्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारने अखेर इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

दरम्यान, सध्याच्या संकटाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परकीय चलन वाचवण्याच्या उद्देशाने काही उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये इंधनाचा काटकसरीने वापर करणे, सोन्याची खरेदी पुढे ढकलणे आणि परदेश प्रवास स्थगित करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली असून, सध्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 95 च्या पातळीच्या खाली घसरले आहे.

देशात महागाईचा दबाव आता अत्यंत वेगाने वाढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. एप्रिल 2016 मध्ये देशाचा घाऊक महागाई दर (WPI) वाढून थेट 8.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.88 टक्के इतका होता. अवघ्या महिनाभरात झालेली ही वाढ गेल्या 42 महिन्यांचा म्हणजेच साडेतीन वर्षांचा विक्रम मोडणारी ठरली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे या महागाईमागचे मुख्य कारण मानले जात आहे. या महागाईच्या वाढीमध्ये ‘फ्यूल आणि पॉवर’ क्षेत्राचे योगदान सर्वाधिक राहिले आहे. मार्चमध्ये केवळ 1.05 टक्क्यांवर असलेली या क्षेत्रातील महागाई एप्रिलमध्ये थेट 24.71 टक्क्यांवर झेपावली आहे.

महत्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर…
शहराचं नाव नवीन दर (पेट्रोल) नवीन दर (डिझेल)

मुंबई – 106.54 93.14
दिल्ली – 97.77 90.78
चेन्नई – 103.84 95.50
कोलकाता – 108.41 95.13
पुणे – 107.84 94.45
बंगळुरू – 102.96 94.10

पुणेकरांच्या खिशाला कात्री! CNGच्या दरात मोठी वाढ; पाहा नवीन दर…

राहुल गांधी यांची पोस्ट! पहिला वार गॅसवर आता नंबर पेट्रोल, डिझेलचा…

Video! पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीने नागरिकांचा संताप; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *