रुपाली चाकणकर यांची 6 तास ईडी चौकशी, गुवाटही दौऱ्याबाबत म्हणाल्या…

rupali-chakankar
Share

मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळीकतेमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर यांची आज (गुरूवार) ईडीने तब्बल सहा तास चौकशी केली. या चौकशीत रुपाली चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबाचे अशोक खरात याच्याबरोबर काही आर्थिक संबंध आहेत का? चाकणकर-खरात यांनी भागिदारीत काही मालमत्ता घेतल्या आहेत का? अशा अनुषंगाने ईडीने रुपाली चाकणकर यांच्यावर प्रश्नांचा मारा केला. परंतु आमच्या कुटुंबाचे अशोक खरात याच्यासोबत कोणतेही आर्थिक संबंध नव्हते आणि आमच्यात जमिनीचे देखील व्यवहार झालेले नाहीत, असे चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.

अशोक खरातच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवले होते. त्यासाठी, रूपाली चाकणकर सकाळी 10.30 वाजतात वरळी ED झोन (ED) 2 च्या ऑफिसमध्ये दाखल झाल्या होत्या. ईडीकडून आजही जवळपास त्यांची 6 तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, अशोक खरातसोबतच्या गुवाहटी दौऱ्यासंदर्भाने भाष्य केले.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

रुपाली चाकणकर यांनी ईडी चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधला, ईडीने चौकशिला बोलवलं तेव्हा मी आले आहे, अनेक बातम्यामधून विपर्यास केला गेला आहे. आज जबाब नोंदवून टाईप करणे यासाठी खूप वेळ लागला. खरात प्रकरणात माझा कोणताही संबंध नव्हता आणि नाही. ईडीने मला आज काय प्रश्न विचारले होते ते लवकरच अहवालातून समोर येईल, तेव्हा सर्व गोष्टी बाहेर येतील. इथून पुढेही मी तपासाला सहकार्य करेन. अशोक खरातकडून जी खाती बनवली गेली ती बनावट होती, समता पतसंस्थेशी माझ्या बहिणीचा संबंध नाही, असेही चाकणकर यांनी यावेळी सांगितले.

चाकणकर यांनी गुवाहाटी दौऱ्याबाबतही माहिती दिली. गुवाहटीसाठी अशोक खरातचं कुटुंब अगोदर गेले होते, त्यानंतर आम्ही कुटुंबासोबत गेलो होतो. मी गुवाहाटीला त्याच्यासोबत गेले नव्हते. आपल्या गुरुसोबत दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो, अनेकांची अशोक खरातवर श्रद्धा होती, आमचीही होती. पण, त्यानंतर खरातच प्रकरण बाहेर आले, असे स्पष्टीकरण रुपाली चाकणकर यांनी गुवाहटी दौऱ्यातील फोटोवरुन दिले आहे.

अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, कॉल किती पाहा…

रुपाली चाकणकर यांचा पाय खोलात; खरातसोबत गुवाहाटी दौरा…

अशोक खरात याची दुसरी बाजू माहीत नव्हती : रुपाली चाकणकर

रुपाली चाकणकर यांची बहीण गोत्यात, ईडीनं पाठवलं समन्स, धक्कादायक आकडा…

खळबळजनक आरोप! अशोक खरात हा एकनाथ शिंदे अन् रुपाली चाकणकर यांचा गुरु…

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना पहिला धक्का…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *