ज्ञानेश कुमार राजीनामा कसा देणार नाहीत तेच पाहू; सीडब्लूसीच्या बैठकीत प्रियंका गांधी यांची दर्पोक्ती

Share

नवी दिल्लीः काँग्रेस कार्यकारी समितीच्या (सीडब्लूसी) बैठकीत आज मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण, निवडणूक आयोगाचे कामकाज आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भात पक्षाच्या आगामी रणनीतीवर चर्चा झाली. ज्ञानेश कुमार राजीनामा कसा देत नाहीत तेच पाहू, असे प्रियंका गांधी म्हणाल्याचे अधिकृत सूत्रांनी येथे सांगितले.

बैठकीदरम्यान राहुल गांधींनी नेत्यांना एसआयआर (एसआयआर) मुद्द्यावर खंबीरपणे आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज आहे, असे सांगून तळागाळातील जनतेपर्यंत पोचण्याचे आवाहन केले.

ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी आधीपासून करत आहे. एसआयआर (एसआयआर) आणि मतदार याद्यांशी संबंधित मुद्द्यांवरून पक्षाने निवडणूक आयोगाविरोधात आपले आंदोलन तीव्र केले आहे. या मुद्द्यावर पक्षाची पुढील रणनीती ठरविण्यासाठी सीडब्ल्यूसीची (सीडब्लूसी) बैठक बोलावण्यात आली होती, असे या सूत्रांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. सूत्रांनुसार, त्यांनी म्हटले आहे की, ज्ञानेश कुमार पंतप्रधानांच्या संरक्षणाशिवाय काम करू शकत नाहीत. ज्ञानेश कुमार जे काही करत आहेत, त्यासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे संरक्षण मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.

सूत्रांनुसार, राहुल गांधी यांनी मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, पूर्वी जिथे लोक ‘चोरी’च्या कथानकावर केवळ २० टक्के विश्वास ठेवत होते, तिथे आता देशातील ८० टक्के लोकांना वाटते की मतचोरी होत आहे. निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीबाबत काँग्रेसने केलेल्या आरोपांच्या संदर्भात राहुल गांधी यांनी हे विधान केले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सीडब्लूसीमध्ये काँग्रेसच्या पाच प्रमुख मागण्या मांडल्या. मतदार यादीतील मोठ्या बदलांची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, ज्या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत, त्यांना माहिती देऊन अपील करण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

याव्यतिरिक्त, राजकीय पक्षांना मतदार यादी आणि संबंधित माहिती वेळेवर सोप्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याची, गंभीर अनियमिततांची स्वतंत्र आणि वेळेवर चौकशी करण्याची आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाच्या माहिती व निर्णयांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!