Video! पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीने नागरिकांचा संताप; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये…

petrol
Share

कराची : अमेरिका आणि इराण यांच्यातील आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरठवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका झाला असून, पेट्रोल आणि डिझेलमध्ये अनुक्रमे 137 आणि 184 रुपयांची वाढ झाली आहे.

पाकिस्तानच्या सरकारने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली, विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानध्ये इंधनाची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर, आता महिनाभरातच ही दुसरी दरवाढ झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याची कमतरता आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे ही दरवाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

Buy Maharashtrache Dada BookDiscount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

पाकिस्तानमध्ये गुरुवारी मध्यरात्री म्हणजे शुक्रवारपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार, डिझेलच्या किंमतीत 54.9% वाढ होऊन 520.35 पाकिस्तानी रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. तर, पेट्रोलच्या किंमतीत 42.7% वाढ झाली असून पेट्रोल 458.40 रुपये (पाकिस्तानी चलन) प्रती लिटर पर्यंत पोहोचले आहे. या नव्या दरानुसार पेट्रोलच्या किंमतीत 137.23 रुपये प्रति लीटर तर डिझेलच्या किंमतीत 184.49 पाकिस्तानी रुपये प्रति लीटर वाढ झाली आहे. त्यामुळे, पाकिस्तानी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींची वाढ थांबवणे कठीण आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचंही त्यांनी सांगितले.

दरम्यान, भारताने या परिस्थितीतही कुठलीही दरवाढ न करण्यावर भर दिला आहे. मात्र, घरगुती गॅसच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली असून सध्यातरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठलीही वाढ झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *