मनोज जरांगे यांचा मोठा गौप्यस्फोट; धनंजय मुंडेंकडून हत्येचा कट…

manoj-jarange
Share

मुंबईः मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. अटक केलेले दोन्ही आरोपी धनंजय मुंडेचा निकटवर्तीय कांचन याच्या संपर्कात होते, त्यांनी अडीच कोटींची सुपारी दिली, असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

मनोज जरांगे यांनी आमच्याकडे आरोपींचे गुप्त रेकॉर्डिंग आहे, असे म्हणत पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव घेतले आहे. अटक केलेल्या आरोपींना बऱ्याच गोष्टी माहीत आहे. त्यांना सिरीयस घेण्याची गरज आहे. बीड जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या गाडीमध्ये सीटखाली मोबाईल ठेवण्यात आले आहेत. जीपीएस ट्रॅकर लावले आहेत, असा दावाही त्यांनी केला.

“गोपीनाथ मुंडेंनी असं राजकारण नाही केलं. त्यांनी सामाजिक लोकांचे कल्याण केले. पण हे नीच (धनंजय मुंडेंना उद्देशून) लोकांना मारतंय किंवा डाव करतंय. माझ्या ध्यानात येत नाही, इतकी माहिती माझ्याकडे आहे. आमच्याकडे काही रेकॉर्डिंग्ज आहेत. ते ऐकून आम्ही थकलोय. तरीही रेकॉर्डिंग संपत नाहीत. अटक केलेल्या आरोपींना खूप गोष्टी माहीत आहेत. मी सांगतोय त्या गोष्टी सिरीयस घ्या. पंकजा मुंडेंचा काय विषय आहे? ते त्या पोरांना सगळं माहीत आहे. बावनकुळेंच्या भाच्याबद्दल काय? हे सगळं आरोपींना माहीत आहे. सुरेश धस, कराड यांच्याबद्दलही महत्त्वाची माहिती त्यांच्याकडे आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघं भाऊ बहीण आहेत, म्हणून मी हे म्हणत नाही. आरोपींनी आम्हाला हे सांगितलं आहे. आम्हाला त्यांनी कराडबद्दल आणि सुरेश धस यांच्याबद्दलही सांगितले आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यानी केलेल्या खळबळजनक गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *