पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण! अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजीनाम्याची मागणी…

parth-ajit-pawar
Share

मुंबईः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी आरोप झाल्यानंतर विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी प्रतिक्रिया याआधी अजित पवार यांनी दिली होती.

जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात अजित पवार यांच्यावर देखील गंभीर आरोप होत आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह विरोधकांनी केली आहे. त्यातच अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.

आपल्याला या व्यवहारासंदर्भात काहीही माहित नाही. आपला काही संबंध नाही, असे अजित पवारांनी याआधी सांगितले आहे. मात्र, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि त्यांच्या घरातच तीनशे कोटी रुपयांचा व्यवहार होत असताना आपल्याला त्या संदर्भात माहिती कशी नाही? असा सवाल अजित पवार यांना विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरत आहे. त्यामुळे आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादस दानवे यांनी केला आहे. महत्वाचं म्हणजे पार्थ पवार यांनी कोरेगाव पार्क येथे आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.

पार्थ पवार अडचणीत! आणखी एक कारनामा समोर, गुन्हा दाखल…

जमीन गैरव्यवहार प्रकरण! अजित पवार यांनी काढला पार्थच्या डोक्यावरचा हात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *