अमेरिकेचा पुन्हा इराणवर हल्ला अन् तळ उद्ध्वस्त; महागाई वाढण्याचे संकट…

iran-war
Share

न्यूयॉर्क : इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार झाल्यानंतरही दोन्ही देशांमधील संघर्ष पुन्हा एकदा पेटला. अमेरिकन सैन्याने शुक्रवारी इराणच्या लष्करी तळांवर थेट एअर स्ट्राइक केले. या हल्ल्याने खळबळ उडाली असतानाच, काही वेळातच इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने अमेरिकेला जशास तसे उत्तर देत, त्यांच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांमधील युद्धाचा भडका पुन्हा झाल्यानंतर महागाई वाढण्याचे संकट आहे.

अमेरिकेने हा हल्ला अचानक केलेला नाही, तर याला इराणची एक चूक कारणीभूत ठरली. अमेरिकन सेंट्रल कमांड नुसार, गुरुवारी होर्मुजच्या समुद्रधुनीजवळ एवर लवली नावाच्या एका व्यापारी जहाजावर इराणने ड्रोन हल्ला केला. इराणने एकूण ४ आत्मघाती ड्रोन सोडले, त्यातील एक ड्रोन जहाजाच्या वरच्या भागावर आदळला. यामुळे जहाजाचे नुकसान झाले. उर्वरित ३ ड्रोन अमेरिकेच्या डिफेन्स सिस्टमने हवेतच पाडले. या गंभीर चिथावणीला चोख उत्तर देण्यासाठीच अमेरिकेने इराणवर थेट एअरस्ट्राईक केला.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

अमेरिकेच्या फायटर जेट्सनी इराणच्या सीमेजवळ असलेल्या मिसाइल आणि ड्रोन तळांवर अचूक निशाणा साधला. यासोबतच सागरी सीमेजवळील रडार साईट्सही उद्ध्वस्त केल्या. हा हल्ला युद्ध सुरू करण्यासाठी नाही, तर इराणने केलेल्या युद्धविरामाच्या उल्लंघनाला दिलेले सडेतोड उत्तर आहे असे अमेरिकन सैन्याने स्पष्ट केले आहे. इराणचा हा ड्रोन हल्ला म्हणजे युद्धविरामाचे ‘मूर्खतापूर्ण उल्लंघन’ असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांनी ‘याला उत्तर देणार का?’ असे विचारले असता, ट्रम्प यांनी मिश्किलपणे ‘तुम्हाला लवकरच समजेल,’ असे म्हटले होते आणि त्यानंतर काही तासांतच अमेरिकेची विमाने इराणवर घोंगावू लागली.

दुसरीकडे, अमेरिकेच्या या कारवाईनंतर इराणही शांत बसलेला नाही. इराणचे प्रवक्ते इब्राहिम अल-फिकार यांनी इशारा दिला आहे की, ‘अमेरिकेने पहिली चूक केली आहे, आता इराण शांत बसणार नाही. यानंतर जर अमेरिकेने पुन्हा धाडस केले, तर असा हल्ला करू की त्यांचा सगळा भ्रम कायमचा संपून जाईल.’

महागाई वाढण्याचे संकट…
दरम्यान, गेल्या आठवड्यातच दोन्ही देशांमध्ये होर्मुजची समुद्रधुनी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खुली ठेवण्यावर आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र, आता पुन्हा दोन्ही देश आमनेसामने आल्यामुळे हा करार धोक्यात आला आहे. या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची आणि पर्यायाने जगभरात महागाई वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिका आणि इराणचं युद्ध थांबलं; मध्यस्थी कोणाची पाहा…

इराण-अमेरिका युद्धामुळे सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल…

अमेरिका-इराण युद्धामुळे काय महागलं? काय स्वस्त झालं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *