मुंबईतील पराभवानंतर राज ठाकरे यांची भावूक पोस्ट; म्हणाले…

raj-thackeray
Share

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल 25 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांना धक्का बसला अन् सत्ता गमावली आहे. भाजपने शिंदेसेनेला सोबत घेऊन महापालिकेवर भगवा फडकवला आहे. मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीत अपेक्षित असं यश मिळालं नाही. मनसेला फक्त 8 जागा निवडून आणता आल्या. मनसेचा स्ट्राईक रेट खूपच कमी राहिल्याने आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट करत पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे.

राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, ‘सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.’

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच. तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *