पुणे: पुण्यातून अजित पवार गटाने गुंडांना तिकीटं वाटल्याने चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार गटाकडून गुंड बंडू आंदेकरची सून लक्ष्मी आंदेकर आणि कुख्यात गुंड गजा मारणे यांना तिकीट देण्यात आले आहे. शिवाय, पुण्याच्या टोळीयुद्धाचा ‘बकासूर’ नावाने ओळख असलेला गुंड म्हणजे बापू नायर. अजित पवार यांच्याकडून मोक्काचा गुन्हेगार बापू नायरला उमेदवारी दिल्याचे स्पष्ट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांनी पुणे मनपासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र केल्या आहेत. कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायरला प्रभाग क्रमांक 39 मधून राष्ट्रवादीतून उमेदवारी देण्यात आली आहे. केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एका छोट्या गावातून उदरनिर्वाहासाठी पुण्यात आलेल्या नायर कुटुंबाचा बापू प्रभाकर नायर हा मुलगा. त्याचे वडील पुण्यात स्थायिक झाले आणि बापू नायर याने बिबवेवाडी परिसरात आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने काही काळ चारचाकी चालकाचे काम केले. मात्र, 2001 मध्ये एका मित्रासाठी घेतलेल्या धावपळीत त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आणि बापू नायरच्या आयुष्याची दिशा बदलली.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
बापू नायर याने हळूहळू बिबवेवाडी, धनकवडी आणि कोंढवा भागात आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. याच काळात त्याचे आणि स्थानिक गुंड बैजू नवघणे यांच्यात वर्चस्वावरून वाद सुरू झाले. 2011 मध्ये एका देवीच्या मिरवणुकीत झालेल्या वादाचा बदला म्हणून बापू नायर टोळीने भरदिवसा बैजू नवघणेचा खून केला. या खुनामुळे पुण्याच्या गुन्हेगारी जगतात बापू नायरचे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले. त्यानंतर त्याने कोथरूडचा कुख्यात गँगस्टर गजानन मारणे याच्याशी हातमिळवणी केली आणि केबल व्यवसायात आपले पाय रोवले.
अनेक वर्षे कारागृहात काढल्यानंतर 2020 मध्ये शिवसेनेचे युवा नेते दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणात बापूचे नाव पुन्हा चर्चेत आले. ससून रुग्णालयात उपचारासाठी आलेला असताना त्याने या कटातील मुख्य आरोपीची भेट घेतल्याचे तपासात समोर आले होते. या गुन्ह्यात त्याला पुन्हा अटक करण्यात आली. 2024 मध्ये जामिनावर बाहेर आला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी बापू नायरला तिकीट दिल्याने अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहे.
गुन्हेगारांना टायरमध्ये घाला अन् गुंडांच्या टोळ्यांमध्ये तिकीट वाटप…
चर्चांना उधाण! कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला अजित पवार गटाकडून उमेदवारी…
मोठी बातमी! पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; पाहा कोणाला किती जागा…
पुणे! गुंड बंडू आंदेकर याने जेलमधून बाहेर येऊन भरला अर्ज अन् हात उंचावत म्हणाला…