पुणे: पुणे महापालिकेची निवडणूक यंदा तिरंगी होणार असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी एबी फॉर्मचं वाटप सुरू आहे.
अजित पवार यांच्या भेटीसाठी जिजाऊ निवासस्थानी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरे, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह अनेक नेते देखील जिजाऊवर अजित पवारांच्या भेटीसाठी आले. अशातच आता अजितदादा गटाने कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
पुणे महापालिकेसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली. त्या माजी नगरसेविका आहेत. त्यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीला टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. जयश्री मारणेला अजित पवार गटाकडून प्रभाग 10 बावधनमधून एबी फॉर्म देण्यात आला आहे. गुन्हेगारी मिटवा म्हणणाऱ्या अजित पवार यांनी गजा मारणे याच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जयश्री मारणे यांनी 2012 साली पुण्यामध्ये कोथरुडमधून पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. यावेळेस त्या मनसेच्य़ा तिकिटावर निवडूनही आल्या होत्या. आता 2022 मध्ये जयश्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अशातच आता त्या अजित पवार गटाकडून अधिकृतरित्या उमेदवार आहेत. जयश्री मारणे यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर उमेदवारी दिली जाईल, याची चर्चा होती.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते दीपक मानकर यांची दोन्ही मुलं निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. एकाला भाजपने तर दुसऱ्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. बापू मानकर भाजपकडून तर हर्षवर्धन मानकर राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे. दोन्ही पक्षाकडून मुलांना उमेदवारी मिळाल्याने आता दीपक मानकर नेमका राष्ट्रवादीचा प्रचार करणार की भाजपचा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार यांनी रुपाली पाटील यांना एबी फॉर्म दिला आहे. प्रभाग क्रमांक २६ मधून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील लोकांची राजकारणाकडे वाटचाल सुरू असल्याचं पहायला मिळालं होतं. लंडनला पळून गेलेला निलेश घायवळचा भाऊ देखील निवडणुकीत उभा राहणार होता. तसेच बंदू आंदेकर टोळीतील तिघांनी निवडणुकीत उभं राहण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. अशातच आता तिसरी टोळी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.